Marathi News

घरामध्ये लाफिंग बुद्धा का आणि कुठे ठेवावा? जाणून घ्या महत्व

Published:
वास्तू शास्त्रामध्ये काही विशिष्ट वस्तू घरामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वस्तू सुख समृद्धीचे प्रतीक समजले जातात.
घरामध्ये लाफिंग बुद्धा का आणि कुठे ठेवावा? जाणून घ्या महत्व

Importance of Laughing Buddha according to Vastu Shastra:  वास्तुशास्त्र वास्तुकलेच्या विज्ञानाचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वास्तुबाबत विविध नियम सांगितलेले असतात. जेणेकरून त्या वास्तूमध्ये फक्त सकारात्मकता राहील. वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूची एक आपली विशिष्ट जागा असते. त्या जागेमध्ये त्या वस्तू ठेवल्याने त्यांना सकारात्मक लहरी मिळतात. ज्यामुळे घरात फक्त सकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळेच या शास्त्राला विशेष महत्व आहे.

तसेच वास्तू शास्त्रामध्ये काही विशिष्ट वस्तू घरामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वस्तू सुख समृद्धीचे प्रतीक समजले जातात. त्यातीलच एक म्हणजे लाफिंग बुद्धा होय. आपण अनेकांच्या घरामध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती पाहिली असेल. आज आपण लाफिंग बुद्धाचे महत्व आणि ते ठेवण्याची योग्य स्थान जाणून घेणार आहोत.

 

घरामध्ये लाफिंग बुद्धा ठेवण्याचे महत्व-

फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धा जपान आणि चीनमध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आता सर्वच देशांमध्ये लाफिंग बुद्धाचे महत्व माहिती झाले आहे. त्यामुळे आपल्या देशातही अनेकजण लाफिंग बुद्धा घरात ठेवतात. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरामध्ये धन आकर्षित होते. तसेच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. परंतु अनेक लोक लाफिंग बुद्धा चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेला ठेवतात. त्यामुळे त्याचा हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे त्याची योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे.

 

घरात लाफिंग बुद्धा कुठे ठेवावे?

शांती आणि सामंजस्यासाठी-

फेंगशुईनुसार घरामध्ये शांती आणि सामंजस्य हवे असेल तर लाफिंग बुद्धा पूर्व दिशेला ठेवावे. यामुळे घरातील वादविवाद आणि अडचणी दूर होतात. नात्यामधील प्रेम वाढते.

 

नोकरी मिळवण्यासाठी-

घरातील लाफिंग बुद्धाच्या स्थतीचा प्रभाव नोकरीवर पडू शकतो. घरातील एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात असेल किंवा नोकरी असेल. तर लाफिंग बुद्धा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. त्यामुळे नोकरी मिळणे सोपे होईल. शिवाय घरातील आर्थिक चणचण दूर होईल.

 

कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी-

तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी येत असतील. किंवा व्यावसायिक आयुष्य अडचणीत असेल. तर लाफिंग बुद्धा मदत करू शकते. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी लाफिंग बुद्धा अशा ठिकाणी ठेवा जिथे सहज लोकांची सहज नजर पडेल. असे केल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो. त्यामुळे तुमची प्रगती होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews