दिल्लीत आई-मुलाच्या नात्याला गालबोट; नराधम तरूणाचा आईवर अत्याचार…नेमकं प्रकरण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा आणि 25 वर्षीय मुलगी देखील एकाच घरात राहत होते. पोलिसांनी आरोपील अटक केली आहे.
दिल्लीत आई-मुलाच्या नात्याला गालबोट; नराधम तरूणाचा आईवर अत्याचार…नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेत आईवर दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून मुलाने 65 वर्षीय आईवरच अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं होण्यास भाग पाडलं. नराधम मुलाने आधी वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला, त्यानंतर आईवरच दोनवेळा अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होताच 39 वर्षीय आरोपी मुलास अटक करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार,  पीडित महिला आपल्या सरकारी नोकरीतील सेवानिवृत्त पतीसोबत हौज काझी परिसरात राहत होती. येथील घरी तिच्यासमवेत तिचा आरोपी मुलगा आणि 25 वर्षीय मुलगी देखील एकाच घरात राहत होते.

महिलेच्या फिर्यादीत काय?

1 ऑगस्ट रोजी पीडित महिला व कुटुंब सौदी दौऱ्यावर दिल्लीच्या घरी आले असता मुलाने आईसोबत जबरदस्ती केली. मुलाने माझा बुरखा उतरवला, मला एका खोलीत बंद करुन मारहाणही केली, असे पीडित आईने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. लहानपणी आईनेच मला बिघडवल्याचा आरोपही मुलाने केला आहे. दरम्यान, मुलाच्या या वर्तणुकीमुळे घाबरलेल्या आईने थेट शेजारी राहणाऱ्या आपल्या मोठ्या मुलीचे घर गाठले होते. 11 ऑगस्ट रोजी पीडित महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी आली, पण मुलाकडून अत्याचार करण्यात येत होता, असेही तक्रारीत म्हटलं आहे. मुलाने रात्री 9.30 वाजता आईसोबत खासगीत बोलायचं म्हणत आईला एका खोलीत नेलं, तिथं जबरदस्ती करत मी तुला जुन्या अनैतिक संबंधाची शिक्षा देत असल्याचेही म्हटले. त्यानंतर, 14 ऑगस्ट रोजी पुन्हा दुसऱ्यांदा रात्री 3.30 वाजता आईसोबत दुष्कर्म केल्याचंही पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दिल्लीत महिला असुरक्षित!

यानिमित्ताने दिल्लीतील महिला असुरक्षितता हा गेल्या काही वर्षांपासून गंभीर विषय ठरला आहे. राजधानीत महिला व मुलींवर होणाऱ्या छेडछाड, बलात्कार, अपहरण, घरगुती हिंसा यांसारख्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, बसमध्ये किंवा अगदी कामाच्या ठिकाणीही महिलांना सुरक्षित वाटत नाही. पोलिस यंत्रणा व न्यायव्यवस्था कठोर कारवाई करत असली तरीही गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, महिला हेल्पलाइन, पिंक बस सेवा, स्वसंरक्षण प्रशिक्षण अशा उपाययोजना सुरू आहेत. मात्र खरी बदल घडवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आणि महिलांना समान सन्मान देणे अत्यावश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews