Mon, Dec 22, 2025

Emraan Hashmi Injured: इमरान हाशमी शूटिंगदरम्यान जखमी; ‘आवारापन 2’च्या सेटवर गंभीर दुखापत

Published:
राजस्थानात चित्रपटाचं शूट सुरू असताना एका धोकादायक सीक्वेन्समध्ये इमरानला जोरदार मार बसला. पोटात खोलवर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर त्यांच्या पोटावर बांधलेली पट्टी दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Emraan Hashmi Injured: इमरान हाशमी शूटिंगदरम्यान जखमी; ‘आवारापन 2’च्या सेटवर गंभीर दुखापत

Emraan Hashmi Injured : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी सध्या ‘आवारापन 2’ या अॅक्शन थ्रिलरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 2007 मध्ये आलेल्या ‘आवारापन’च्या सिक्वेल असलेल्या या चित्रपटाच्या सेटवरून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अॅक्शन सीनदरम्यान इमरान हाशमीच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं? Emraan Hashmi Injured

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानात चित्रपटाचं शूट सुरू असताना एका धोकादायक सीक्वेन्समध्ये इमरानला जोरदार मार बसला. पोटात खोलवर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर त्यांच्या पोटावर बांधलेली पट्टी दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अहवालानुसार, उपचारानंतर इमरानची तब्येत आता स्थिर आहे आणि त्यांनी पुन्हा सेटवर हजेरीही लावली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांना अॅक्शन सीन्सपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या जखमेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं शेड्यूल बदलण्यात आलं आहे आणि पुढील सर्व अॅक्शन सीन पुढे ढकलण्यात आले आहेत.

चाहते चिंतीत

इमरानचे चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पहिलाच प्रसंग नाही, यापूर्वीही ‘गुडाचारी 2’च्या शूटिंगदरम्यान त्यांना दुखापत झाली होती. तरीही त्यांनी शूटिंग थांबवले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. Emraan Hashmi Injured

कामाच्या फ्रंटवर बोलायचे झाले तर ‘आवारापन 2’ व्यतिरिक्त इमरान हाशमी नेटफ्लिक्सवरच्या ‘तस्करी’, तेलुगू ‘जी 2’ आणि ‘गनमास्टर’मध्ये झळकणार आहेत. आता ‘आवारापन 2’च्या सेटवरील या अपघातानंतर चित्रपटाच्या निर्मितीवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.