2026 च्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या कमाईने ‘धुरंधर’ची केली धुलाई; 11 दिवसात बजेटपेक्षा ५ पटीने अधिक कमाई

Written by:Smita Gangurde
Published:
बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंह याचा सुपरहिट चित्रपट 'धुरंधर' आणि प्रभासचा 'द राजा साब' याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र मोठ्या चित्रपटांच्या त्सुनामीमध्ये एक छोटाशा मराठी चित्रपटाने सर्वांना हैराण केलं आहे.
2026 च्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या कमाईने ‘धुरंधर’ची केली धुलाई; 11 दिवसात बजेटपेक्षा ५ पटीने अधिक कमाई

KJVMM box office collection: बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंह याचा सुपरहिट चित्रपट ‘धुरंधर’ आणि प्रभासचा ‘द राजा साब’ याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र मोठ्या चित्रपटांच्या त्सुनामीमध्ये एक छोटाशा मराठी चित्रपटाने सर्वांना हैराण केलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. या चित्रपटाने ११ दिवसात आपल्या बजेटच्या पाचपट कमाई करीत इतिहास रचला आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. हेमंत ढोमे या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे.

चित्रपटाचं कथानक…

क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटात मराठी माध्यमातील शाळांच्या परिस्थितीचं कथन करण्यात आलं आहे. इंग्रजी शाळांच्या धबडग्यात मराठी शाळांना टाळं लागत आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांना गुणी, विद्वत्तापूर्ण बनविणाऱ्या या मराठी शाळा केवळ भाषेमुळे बंद होत आहेत. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरीश दुधाडे सारखे कलाकाल मुख्य भूमिकेत आहेत.

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाचं कलेक्शन l krantijyoti vidyalay marathi madhyam collection 

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, चित्रपटाचे बजेट फक्त २ कोटी होते. पहिल्या आठवड्यात त्याने ६.१४ कोटी कमावले. दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढ झाली आणि त्यात ५.११ कोटींची भर पडली. एकूण ११ दिवसांत चित्रपटाचं कलेक्शन ११.२५ कोटींवर पोहोचले आहे. याचा अर्थ निर्मात्यांनी ९.२५ कोटींचा निव्वळ नफा कमावला, जो बजेटच्या ४६२.५ टक्के आहे. त्या तुलनेत, रणवीर सिंगच्या “धुरंधर” (अंदाजे ₹२२५ कोटी बजेट) ने ३८ दिवसांत भारतात ८५७.४० कोटी कमावले, जो अंदाजे २८१ टक्के नफा आहे. नफ्याच्या टक्केवारीच्या बाबतीत, मराठी चित्रपटाने बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Follow Us :GoogleNews