मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सेवा तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यानची लोकल सेवा सलग तीन महिन्यांसाठी थांबवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिला असून लवकरच त्याची अधिकृत अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पश्चिम लाईनवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणी निर्माण होणार आहेत.
नेमका काय निर्णय झाला? Mumbai Local Train
पश्चिम रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते CSMT दरम्यानच्या लोकल ट्रेन सेवेला संपूर्ण ३ महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात: गोरेगाव ते वांद्रे दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल तर वांद्रे ते CSMT दरम्यान मर्यादित लोकल फेऱ्या राखण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवर नियमित धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये कपात होणार आहे आणि प्रवाशांनी पर्यायी मार्ग स्वीकारावा लागत आहे. Mumbai Local Train
लोकल बंद करण्यामागचं मुख्य कारण?
लोकल ट्रेन सेवा थांबवण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे पाचवी आणि सहावी मार्गिका (5th & 6th Line) निर्माणाचे काम….या कामाला गती देण्यासाठी वांद्रे–खार दरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून नवीन मार्गिका तयार करण्याचे महत्त्वाचे काम सुरु करण्यात येणार आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यावर चर्चगेट ते बोरीवली आणि विरार दरम्यान लोकल गाड्यांची संख्या वाढवता येईल, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र ट्रॅकवर धावतील, त्यामुळे प्रवाशांची वेळ वाचेल आणि सेवा अधिक वेगवान व सुरक्षित होईल.
सुरुवातीचा कालावधी कमी का केला?
सुरुवातीला प्रशासनाने या कामासाठी सहा महिने वेळ ठरवला होता. तरीही प्रवाशांना जास्त त्रास होऊ नये म्हणून हा कालावधी 3 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ₹964.84 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2027 पर्यंत ठेवण्यात आली आहे.
प्रवासावर काय परिणाम होणार?
सध्या या मार्गावर दररोज सुमारे 3.62 लाख प्रवासी लोकल सेवेमुळे प्रवास करतात. गोरेगाव ते CSMT दरम्यान 88 लोकल फेऱ्या, तर वांद्रे ते CSMT दरम्यान 106 लोकल फेऱ्या नियमितधारेने धावतात. या ब्लॉकच्या काळात प्रवाशांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागेल: पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेकडे जाण्यासाठी अंधेरी किंवा दादर मार्गे जाणे आवश्यक आहे.






