Pune To Mumbai Buses Cancelled : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व ST बसेस रद्द

Published:
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे मागील २२ तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
Pune To Mumbai Buses Cancelled : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व ST बसेस रद्द

Pune To Mumbai Buses Cancelled : पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे मागील २२ तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

गॅस गळतीमुळे महामार्गावर गंभीर परिस्थिती (Pune To Mumbai Buses Cancelled)

मुंबई–पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅसने भरलेला टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक्सप्रेसवे तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः बंद केली आहे.

या अपघातानंतर गेल्या २० तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, अजूनही परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहनांची गती कासवगतीने सुरू असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस सेवा काही तासांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली या मार्गांवरील एसटी बस फेऱ्यांचा समावेश आहे. Pune To Mumbai Buses Cancelled

१३९ एसटी फेऱ्या रद्द; १६३ बस वाहतूक कोंडीत अडकल्या

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या गॅस गळतीच्या घटनेमुळे राज्यातील एकूण १३९ एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७३ ई-शिवनेरी बस फेऱ्या, ६६ इतर एसटी बस फेऱ्या यांचा समावेश आहे. याशिवाय, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६३ बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामध्ये