Mon, Dec 29, 2025

धक्कादायक! मुंबईत 10 कोटींच्या खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्रीला अटक

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आहे. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं. खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! मुंबईत 10 कोटींच्या खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्रीला अटक

मराठी कलाविश्वात  खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन महिलांपैकी एक मराठी अभिनेत्री असल्याने या प्रकरणाने रिअल इस्टेट आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक हेमलता पाटकर आहे, जिला हेमलता आदित्य पाटकर किंवा हेमलता बाणे म्हणूनही ओळखले जाते, तिचे वय 39 असून ती कांदिवलीची रहिवासी आहे.

10 कोटींचं खंडणी प्रकरण; अभिनेत्री अटकेत

गोरेगावमधल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक मराठी अभिनेत्री असल्याचं समजताच मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. हेमलता पाटकर असं त्या अभिनेत्रीचं नाव असून ती छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीची सून आहे. कांदिवली इथली हेमलता आणि सांताक्रूझ इथली अमरिना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना दोघींना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं.

हेमलता पाटकर ही ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. आरोपी हेमलता आणि अमरिना यांना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना आधी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघींना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

खंडणीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

अटक झालेल्या महिलांपैकी हेमलता पाटकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करते तसेच लावणी डान्सर म्हणून कार्यरत आहे. अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये तिने काम केले आहे.  छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतही तिने काम केले आहे.

गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी न बिल्डर अरविंद गोयल (वय 52 वर्षे) यांच्या मुलावर आंबोली पोलिस ठाण्यात एक फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला मिटवण्यासाठी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांनी गोयल यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खंडणी स्वरूपात उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच अरविंद गोयल यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री हेमलता पाटकर याआधीही गुन्हे प्रकरणात सामील झाली आहे. २०२१ मध्ये 10 लाखांच्या फसवणुकीबाबत तिच्यावर गुन्हा नोंद आहे. त्याचबरोबर मेघवाडी पोलिस ठाण्यात मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आणि शिवीगाळ (कलम 452, 323, 504) यांसारखे गुन्हे दाखल आहेत.