MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेत विविध पदांसाठी परती होणार, प्रक्रिया जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सहाय्यक विद्युत अभियंता आणि इतर पदांसाठी भरती करणार आहे. एकूण ८० जागांसाठी ही भरती असणार आहे.
नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेत विविध पदांसाठी परती होणार, प्रक्रिया जाणून घ्या!

सरकारी नोकरी अथवा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सहाय्यक विद्युत अभियंता आणि इतर पदांसाठी भरती करणार आहे. एकूण ८० जागांसाठी ही भरती असून इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. मुलाखतीची तारीख १२, १५, १६ आणि १८ सप्टेंबर २०२५ असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची माहिती जाहिरातीत दिलेली आहे. त्यामुळे या भरतीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर जाणून घेऊ…

80 तांत्रिक जागांसाठी रेल्वेची मोठी भरती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट २०२५ मध्ये सहाय्यक विद्युत अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, तांत्रिक सहाय्यक/ईएलई या पदांसाठी एकूण ८० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १२, १५, १६ आणि १८ सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात नोकरी स्थानांसाठी असून, निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळांवरून तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू शकता.

तरूणांची सरकारी नोकरीसाठी मोठी धडपड

आजच्या काळात तरुणांची सरकारी नोकरीसाठी मोठी धडपड सुरू आहे. सुरक्षित भविष्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी बहुतेक युवक सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात. स्थिर पगार, निवृत्तीनंतरची पेन्शन, आरोग्य सुविधा आणि नोकरीतील सुरक्षितता हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. दिवस-रात्र अभ्यास करून ते परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झटत असतात. मात्र या स्पर्धेत यश मिळवणे सोपे नसते. खूप मेहनत, चिकाटी आणि संयमाची गरज असते. तरीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची धडपड कायम सुरूच असते.