राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अलीकडेच मनसे आणि ठाकरे बंधुंच्या राजकीय युतीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता मनसेकडून उमेदवारांची नावे देखील घोषित करण्यात येत आहे. अशा परिस्थितीतमध्ये मनसेसाठी महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या ठाण्यातून मनसेच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागेचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. मात्र दुसरीकडे मनसेने काल रात्री 24 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे.
मनसेची ठाण्यातील उमेदवारांची नावं समोर
राज्यभरातील उमेदवारांच्या नावांची यादी समोर येत आहे. मनसेसाठी महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या ठाण्यातून मनसेच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागेचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. मात्र दुसरीकडे मनसेने काल रात्री 24 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून काल रात्री उशिरा मनसेचे नैनेश पाटणकर – ठाणे पालघर जिल्हा सचिव यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मच वाटप करण्यात आलं.
रवींद्र मोरे – प्रभाग क्रमांक २,
निलेश चव्हाण- प्रभाग क्रमांक ३
पुष्कर विचारे – प्रभाग क्रमांक ५
सचिन कुरेल- प्रभाग क्रमांक ८
सविता मनोहर चव्हाण – प्रभाग क्रमांक २०
संगीता जोशी – प्रभाग क्रमांक २१
रश्मी सावंत – प्रभाग क्रमांक १६
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (एकसंध) शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणुकीत शिवसेनेने ६७ जागा जिंकल्या होत्या. तर अखंड राष्ट्रवादीने ३४ जागा जिंकल्या गोत्या. भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदा मुंबई आणि ठाण्याच्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने चांगलीच कंबर कसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
बाळा नांदगावकरांनी सगळं गणित मांडलं !
“प्रत्येक जागा ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक अस्तित्वाची आहे. मराठी माणसासाठी मुंबई वाचवायची आहे. कार्यकर्त्यांनी आपपाल्या मतदारसंघात उमेदवार फॉर्म भरताना त्यांच्यासोबत राहा. एनसीपी सुद्धा आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारी अर्ज भरायचा आहे. प्रचारात पूर्णपणे सहभागी होऊन काम करायचं आहे. शिवसेना-मनसेचा उमेदवार असेल त्याला मदत करायची आहे. असा संदेश राज ठाकरेंनी कोअर टीमला दिला आहे“ असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
‘मनसेकडून एबी फॉर्म दिले जातील. राजगड कार्यालयातून एबी फॉर्म दिले जातील‘ असं बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे किती जागांवर निवडणूक लढवत आहे? या प्रश्नावर त्यांनी एबी फॉर्म आल्यावर तुम्हाला समजेलच असं उत्तर दिलं. “आतापर्यंत आमच्या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत. काही सीट इकडच्या तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल, तशी त्यांच्याकडे होईल. पण कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. कारण अशा निवडणुका ठाकरे बंधु वारंवार लढवणार आहेत. त्यांचं भविष्य उज्वल आहे“ असं बाळा नांदगावकर म्हणाले.





