शेगाव गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्तांमध्ये मोठा उत्साह

Written by:Rohit Shinde
Published:
शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. यामुळे भक्तांमध्ये चांगलं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
शेगाव गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्तांमध्ये मोठा उत्साह

विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज आषाढी एकादशी च्या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. हे पालखीचे 56 वे वर्षे आहे. श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास दिनांक 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे रात्रीच्या मुक्कामी राहील.

शेगावच्या पालखीची महती मोठी

शेगवा गजानन महाराज यांची पालखी यात्रा ही भक्तांसाठी अतिशय श्रद्धेची आणि भक्तिभावाची पर्वणी असते. प्रत्येक वर्षी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथून निघणारी पालखी अनेक गावांमधून प्रवास करून भक्तांना दर्शन देते. पालखी सोहळ्याच्या मार्गावर भक्त मोठ्या संख्येने सामील होतात, भजन, किर्तन, नामस्मरण याने वातावरण भक्तिमय होते. महाराजांच्या चरणस्पर्शाने गावपाड्यांना पावनता लाभते. या यात्रेमुळे भक्तांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. गजानन महाराजांचे उपदेश, त्यांचे जीवनकार्य आणि त्यागभावना या पालखीच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचते. ही यात्रा भक्तांच्या मनात श्रद्धा, सेवा, आणि भक्ती यांचे बीज रोवते. त्यामुळे पालखी सोहळा हे अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते.

कसे असेल पालखीचे नियोजन?

३ जुन रोजी पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे ४ व ५ जुन असे दोन दिवस मुक्काम राहील. ६ जुन रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, ७ जुन रोजी देऊळगाव (बाभूळगाव) पातूर, ८ जुन मेडशी श्री क्षेत्र डव्हा, ९ जुन मालेगाव शिरपूर जैन, १० जुन चिंचापा पेन-म्हसला पेन, ११ जुन किनखेडा-रिसोड, १२ जून नपानकन्हेरगाव-सेनगाव, १३ जुन श्री क्षेत्र नरसी (नामदेव) डिग्रस, १४ जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ जवळा बाजार येथे मुक्काम राहील.

त्यानंतर, १५ जून हट्टा (अडगांव रंजोबा) श्री क्षेत्र त्रिधारा, १६ जून परभणी परभणी, १७ जून ब्राह्मणगाव दैठणा, १८ जुन खळी गंगाखेड, १९ जुन वडगाव (दादा हरी) परळी (थर्मल), २० जून परळी परळी वैजनाथ, २१ जून कन्हेरवाडी अंबाजोगाई, २२ जून लोखंडी सावरगाव बोरी/सावरगाव, २३ जून गोटेगाब कळंब, २४ जून गोविंदपूर तेरणा सा. कारखाना, २५ जून किनी उपळा (माकडाचे), २६ जून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (धाराशिव) धाराशिव, २७ जून बडगाब सिद्धेश्वर श्री क्षेत्र तुळजापूर, २८ जून सांगवी, ऊळे, २९ जून सोलापूर, सोलापूर, ३० जुलै सोलापूर असा राहिल प्रवास.

आषाढी वारी भक्तांसाठी मोठी पर्वणी

आषाढी वारी ही भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भाविकतेची पर्वणी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ-मृदुंगासह पदयात्रा करतात. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणतो. वारीमुळे श्रद्धा, निष्ठा आणि सामाजिक एकतेचा संदेश प्रसारित होतो.

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews