BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक बघायच्या दिवसावर आली असून अतिशय चुरशीची आणि रंगतदार असे निवडणुकीचे वातावरण बघायला मिळते.. मुंबईत ठाकरे बंधू आणि शिंदे फडणीसांची माहिती असं थेट सामना बघायला मिळतो. एकीकडे महायुतीकडून विकासाच्या मुद्द्यावर मते मागितले जात असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा आवळला आहे. ठाकरे पण तुमचे हे मराठी ट्रम्प कार्ड नेमका किती यशस्वी होणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल, मात्र त्यापूर्वीच एका सर्वेमध्ये मुंबईत ठाकरे बंधूंची किती हवा आहे ते स्पष्ट झाल आहे.
मागील काही दिवसापासून मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद कमी झाली असली तरी ठाकरे ब्रँड कडे अजूनही मुंबईतील मराठी मतदार झुकताना दिसतोय. सी वोटरच्या सर्वेनुसार, मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची क्रेझ दिसत आहे. या तुलनेत मराठी मतदार मात्र ठाकरे बंधूंपासून काही प्रमाणात दुरावलेला आहे.
ठाकरे बंधू अजूनही मोठा ब्रँड (BMC Election 2026)
“ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का?” असा सवाल मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांना विचारण्यात आला असता त्यावर 49.2 टक्के मराठी भाषिक मतदारांनी हो असं उत्तर दिले आहे. 25.3 टक्के लोकांचे मत आहे की ठाकरे ब्रँड हा काहीसा कमकुवत झाला आहे. तर 16.2 टक्के लोक म्हणतात की नक्की याबाबत आत्ता सांगू शकत नाही.
हिंदी भाषिक काय म्हणतात?
हिंदी भाषिक मतदारांचा कौल मात्र अगदी याच्या उलट आहे. 24 टक्के हिंदी भाषिकांचे मत आहे की मुंबईत ठाकरे ब्रँड अजूनही कायम आहे. मात्र 48.4 टक्के हिंदी भाषिक मतदारांना वाटते की ठाकरे ब्रँड कमकुवत झाला आहे. 14.2 टक्के मतदार म्हणतात की याबाबत आत्ताच सांगू शकत नाही. BMC Election 2026
दरम्यान यंदाची मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्त्वाची नेतृत्व आहे. त्या ठाकरे बंधूसमोर महायुतीचे तगडे आव्हान आहे. त्यातच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसने मुंबईत वंचित सोबत आघाडी केल्याने मुस्लिम मतदारांमध्ये मोठी विभागणी होण्याची शक्यता असून त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो.





