BMC Election 2026 : मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा; राज ठाकरेंचा मराठी माणसांना कानमंत्र

Published:
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, मुंबई गुजरातशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. गुजरातला जोडून मुंबई महाराष्ट्राकडून काढून घेण्याचा कट रचला जातोय. त्याची आता सुरुवात झाली आहे. मुंबई गुजरातला न्यायची, हे अगोदरपासूनच त्यांच्या डोक्यात आहे.
BMC Election 2026 : मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा; राज ठाकरेंचा मराठी माणसांना कानमंत्र

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी आपल्याला मुंबईला वाचवायचा आहे. ही आपली शेवटची लढाई आहे त्यासाठी त्वेषाने लढा. आज हरला तर कायम चेहरा असा कानमंत्र राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. तसेच भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून कसं तोडत आहे हे सुद्धा राज ठाकरेंनी मुंबईकरांना समजावून सांगितले.

काय म्हणाले राज ठाकरे? BMC Election 2026

आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, मुंबई गुजरातशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. गुजरातला जोडून मुंबई महाराष्ट्राकडून काढून घेण्याचा कट रचला जातोय. त्याची आता सुरुवात झाली आहे. मुंबई गुजरातला न्यायची, हे अगोदरपासूनच त्यांच्या डोक्यात आहे. त्यासाठी आधी पालघर ताब्यात घेतलं जातंय. वाढवण ताब्यात घेतलं जातंय. नंतर ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत. मुंबई विकत घेता येत नाही, तर बदाबदा पैसे टाकून जमीन विकत घेत आहेत. सांगली कोल्हापुरातून आलेल्या लोकांना मुंबईत घर नाकारले जात आहे.  याउलट, उत्तर भारतीयांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. BMC Election 2026

अन्नामलाई च्या विधानावर टीका

दरम्यान, भाजपचे तमिळनाडूचे नेते के अण्णामलाई यांनी विधान केलं होतं की मुंबई हे महाराष्ट्राचे शहरच नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे या विधानाचाही राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मुंबईत  रसमलाई आली होती… म्हणतो मुंबई आणि महाराष्ट्र चा काय संबंध? भडव्या तुझा काय संबंध आहे येथे यायचा? बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हटाव लुंगी बजाव पुंगी… एकटे असलो तरी काफी आहोत असं म्हणत राज ठाकरे यांनी अण्णामलाई याला प्रतिउत्तर दिल