Ajit Pawar : … तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Published:
निवडणूक आयोगानं सांगितलं तर 14 जानेवारीचा हप्ता पुढे ढकलू, 14 जानेवारीला मिळणारा हप्ता आम्ही 16 जानेवारीला देऊ असं अजित पवार म्हणाले
Ajit Pawar : … तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मकर संक्रांती पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. यानंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाल पत्र लिहून 14 जानेवारीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे द्यावेत असं म्हटलं. काँग्रेसचे या भूमिके नंतर लाडक्या बहिणी मात्र चांगल्या चिंतेत आल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या पैशाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)

निवडणूक आयोगानं सांगितलं तर 14 जानेवारीचा हप्ता पुढे ढकलू, 14 जानेवारीला मिळणारा हप्ता आम्ही 16 जानेवारीला देऊ असं अजित पवार म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवारांनी याबाबत माहिती दिली.   अजित पवारांच्या या उत्तरामुळे ही गोष्ट तर स्पष्ट झाली की 14 किंवा 16 जानेवारीला लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेतच. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. Ajit Pawar

रोहित पवारांच्या स्तुती वरून काय म्हणाले

मागील आठवड्यात पुण्यातील एका जाहीर सभेत रोहित पवार यांनी अजित पवार यांची तुलना केजीएफ चित्रपटातील रॉकीभाईशी केली होती. अजित दादा हे केजीएफ मधील रॉकीभाई आहेत असे रोहित पवार म्हणाले होते. त्याबाबत विचारल असता मी केजीएफ पाहिलेला नाही…मी केजीएफ पाहतो आणि नंतर ठरवतो की रोहित ने मला रॉकी भाई म्हटले ते योग्य की अयोग्य, असं अजित पवार म्हणाले