Politics News : उद्धव, राज की शिंदे? बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? C Voter च्या सर्व्हेत कोणाला पसंती?

Published:
उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असले तरी बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार हे एकनाथ शिंदे हेच असल्याचे शिंदे गटाकडून सातत्याने बोलले जाते
Politics News : उद्धव, राज की शिंदे? बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? C Voter च्या सर्व्हेत कोणाला पसंती?

Politics News : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिंदे घटना नंतर सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याची टीका केली जाते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असले तरी बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार हे एकनाथ शिंदे हेच असल्याचे शिंदे गटाकडून सातत्याने बोलले जाते. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आलाय त्यात उद्धव ठाकरेंच्या जोडीला राज ठाकरे असल्याने ठाकरे बंधूंची ताकद मजबूत झाली आहे. त्यातच आता बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण ??एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे की राज ठाकरे याबाबत एक नवीन सर्वे समोर आहे.

काय म्हणते जनता (Politics News)

सी व्होटर च्या सर्वेनुसार, एकूण 41 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे हीच बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असल्याचे म्हटले आहे.  27.6 टक्क्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून  एकनाथ शिंदेंना पसंती दिली आहे, तर 10.4 टक्के लोकांनी राज ठाकरे यांना ठाकरे ब्रँडचा खरा वारसदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. 8.8 टक्के लोकांनी ‘कोणीच नाही’ अस उत्तर दिलं तर 5.8 टक्केलोकांनी ‘ठाकरे ब्रँड संपला आहे’ असे म्हटल आहे. Politics News

जातीनुसार कोणाला पसंती

अनुसूचित जाती-दलित गटात 47.7 टक्के, उच्चवर्णीय हिंदूंमध्ये 43.4 टक्के, तर मुस्लिम मतदारांमध्ये 37.1 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी गटात मात्र उद्धव ठाकरे (36.2 टक्के) आणि एकनाथ शिंदे (33.7 टक्के) यांच्यात चुरस पाहायल मिळते. एनडीए समर्थक मतदारांमध्ये 39.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे ब्रँडचा वारसदार मानले आहे. तर महाविकास आघाडी मतदारांमध्ये 57.7 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे महाराज असल्याचे मत व्यक्त केला आहे.