१९ वर्षांच्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजाने पदार्पणातच रचला इतिहास, सर्वात वेगवान शतक ठोकून अनेक विक्रम मोडले

Last Updated:
१९ वर्षांच्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजाने पदार्पणातच रचला इतिहास, सर्वात वेगवान शतक ठोकून अनेक विक्रम मोडले

दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली असून, पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या लुआन ड्री प्रिटोरियसने विक्रमांचा पाऊस पाडला आहे. एकीकडे झिंबाब्वेचे गोलंदाज तडाखेबाज मारा करत होते, तर दुसरीकडे प्रिटोरियसच्या बॅटमधून धावा बरसत होत्या. त्याने आपल्या कसोटी पदार्पणात १५३ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ४ षटकार ठोकले. प्रिटोरियसने या खेळीच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमधील दोन मोठे विक्रम मोडले.

लुआन ड्री प्रिटोरियसने मोडले दोन मोठे विक्रम

पहिला विक्रम

म्हणजे लुआन ड्री प्रिटोरियस दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. अवघ्या ११२ चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले, जे कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक मानले जाते. याआधी हा विक्रम स्टीन वॅन जिलच्या नावावर होता, ज्याने डिसेंबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध १२९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. प्रिटोरियस दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणात शतक झळकावणारा सातवा खेळाडू ठरला आहे.

दुसरा विक्रम

म्हणजे तो सर्वात कमी वयात दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पणात शतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १९ वर्षे ९३ दिवसांच्या वयात शतक झळकावले. याचबरोबर, तो कसोटी पदार्पणात शतक करणारा पाचवा सर्वात तरुण खेळाडू झाला आहे. मात्र, त्याला ३० धावांवर जीवदान मिळाले होते. झिंबाब्वेच्या जोरदार अपीलनंतरही पंचांनी काही निर्णय दिला नाही. लक्षात घ्या की या मालिकेत DRS उपलब्ध नाही.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन

टोनी डी झॉर्जी, मैथ्यू ब्र्रीटझके, विआन मुल्डर, डेविड बेडिंगहॅम, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवॉल्ड ब्रीविस, काइल वेर्रैन (wk), कॉर्बिन बॉश, केसव महाराज (कॅप्टन), कोडी युसुफ, क्वेना मफाका.

झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन

ब्रायन बेनेट, तकुजवानाशे कैतानो, निक वेल्च, सीन विलियम्स, क्रेग एर्विन (कॅप्टन), वेस्ली मढेवेरे, तफाद्जवा त्सिगा (wk), वेलिंग्टन मस्काडझा, विन्सेंट मासेकेसा, तनाका चिवांगा, ब्लेसिंग मुजारबानी

Follow Us :GoogleNews