MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा, मुंबईतील या बड्या उद्योगपतीची मुलगी आहे सचिनची होणारी सून

Published:
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा, मुंबईतील या बड्या उद्योगपतीची मुलगी आहे सचिनची होणारी सून

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाला आहे. २५ वर्षांच्या अर्जुनची एंगेजमेंट सानिया चंडोकशी झाली आहे. सानिया प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात आहे. अर्जुनची एंगेजमेंट अत्यंत गुपचूप पद्धतीने पार पडली आहे. सानिया ही अर्जुनची बालपणाची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवि घई हे सचिन तेंडुलकरचे मित्रही आहेत.

साखरपुड्याला जवळचे लोक उपस्थित

 

अर्जुनचे क्रिकेट करिअर

अर्जुन तेंडुलकरने 17 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट ए आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. अर्जुनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 33.51 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. तर 23.13 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहे. दुसरीकडे, लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने 25 विकेट घेतल्या आहे. यावेळी त्याची सरासरी ही 31.2 इतकी आहे. तर 17 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 25.07 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या. तसेच 13.22 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत.