MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Jaisalmer Trip: राजस्थानच्या गोल्डन सिटीची पर्यटकांमध्ये क्रेझ; जैसलमेरमध्ये नेमकं काय विशेष?

Written by:Rohit Shinde
Published:
भारतीय तसेच विदेशी पर्यटकांमध्ये राजस्थानमधील जैसलमेर शहर आणि परिसराची मोठी क्रेझ आहे. दिवसेंदिवस ही क्रेझ वाढत आहेत. नेमकं तिकडे फेसम काय? बजेट ट्रिप कशी करता येईल, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ...
Jaisalmer Trip: राजस्थानच्या गोल्डन सिटीची पर्यटकांमध्ये क्रेझ; जैसलमेरमध्ये नेमकं काय विशेष?

राजस्थानमधील जैसलमेर हे शहर देशी तसेच विदेशी पर्यटकांमध्ये वेगाने लोकप्रिय ठरत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे जैसलमेर, सोनार किल्ला, ऐतिहासिक हवेल्या, वाळवंटातील वाळूचे डोंगर आणि समृद्ध राजस्थानी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. सम वाळवंटातील डेजर्ट सफारी, उंट सफर, लोकनृत्य आणि पारंपरिक संगीत हा पर्यटनाचा खास अनुभव ठरतो. विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊन स्थानिक कला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद घेतात. भारतीय तसेच विदेशी पर्यटकांमध्ये राजस्थानमधील जैसलमेर शहर आणि परिसराची मोठी क्रेझ आहे. दिवसेंदिवस ही क्रेझ वाढत आहेत. नेमकं तिकडे फेसम काय? बजेट ट्रिप कशी करता येईल, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

जैसलमेर आणि परिसरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू 

जैसलमेरचे नाव इ.स. ११५६ मध्ये शहराची स्थापना करणारे महारावल जैसल सिंग यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे शहर वाळवंट सफारी आणि जैसलमेर किल्ल्यासाठी ओळखले जाते. हा किल्ला सुवर्णकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. चला जाणून घेऊया जैसलमेरमध्ये किती दिवस प्रवास करावा आणि कुठे जावे.

जैसलमेर शहर
राजस्थानातील जैसलमेर शहर वाळवंटाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक नगर आहे. पिवळसर दगडांनी बांधलेली घरे, अरुंद गल्ल्या आणि समृद्ध परंपरा यामुळे शहराला वेगळी ओळख मिळते. येथील जीवनशैली, बाजारपेठा आणि लोकसंस्कृती पर्यटकांना विशेष भावतात.

सोनार किल्ला
सोनार किल्ला म्हणजे जैसलमेरची शान. पिवळ्या वाळूच्या दगडातून बांधलेला हा किल्ला सूर्यप्रकाशात सोन्यासारखा झळाळतो. किल्ल्यात आजही लोकवस्ती असून मंदिरे, राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू राजपूत वैभवाची साक्ष देतात.

डेजर्ट सफारी
जैसलमेरची डेजर्ट सफारी हा अविस्मरणीय अनुभव आहे. वाळवंटातील उंट सफर, वाळूच्या टेकड्यांवरील सूर्यास्त आणि पारंपरिक लोकनृत्य पर्यटकांना भुरळ घालतात. रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तंबू निवास रोमांचक अनुभव देतात.

राजस्थानी खाद्य आणि संस्कृती
राजस्थानी खाद्यसंस्कृतीत दाल बाटी चूरमा, केर सांगरी आणि गट्ट्याची भाजी प्रसिद्ध आहे. रंगीबेरंगी पोशाख, घुंगरांचा नाद, लोकनृत्य आणि संगीत या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. पाहुणचार आणि परंपरा राजस्थानची खरी ओळख ठरतात.

जैसलमेरची बजेट ट्रिप कशी प्लॅन कराल ?

तुम्ही आरामात जैसलमेर फिरू शकता. यात बजेट बद्दल बोलायचे झाले तर सोलो ट्रिपकरिता आणि थोडी शॉपिंग करायची असेल तर ८ ते १० हजारांचे बजेट पुरेसे आहे. कुटुंबासोबत जात असाल तर तुमचे बजेट वाढू शकते. तुम्ही ट्रेन किंवा बसने जैसलमेरला जाऊ शकता. रेल्वेने जाणे तुम्हाला स्वस्त प्रवास होऊन जाईल. त्यामुळे एकट्याने जात असाल तर तुम्हाला 10 हजार पुरेसे आहेत. त्यामुळे फॅमिलीतील अनेक सदस्य येणार असतील तर तुम्हाला प्रत्येकाला 10 हजार खर्च होईल, रेल्वे आणि सरकारी बसेस प्रवासाचे किफायतशीर साधने आहेत.