MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

घरातील स्विच बोर्ड्स फारच काळे-मळकट झालेत? स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स

Published:
स्विच बोर्ड्स साफ करण्याचे काही घरगुती आणि सोपे उपाय उपलब्ध आहेत.
घरातील स्विच बोर्ड्स फारच काळे-मळकट झालेत? स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स

Tips for Cleaning Switch Boards:   प्रत्येकालाच आपले घर स्वच्छ आणि टापटीप ठेवायला आवडते. घरातील महिला सतत घराची साफसफाई करण्यात मग्न असतात. परंतु अनेकदा नकळत घरातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. यामध्ये घरातील लाईट्सच्या स्विच बोर्ड्सचा समावेश होतो. स्विच बोर्ड्स अनेक वर्षे साफ न केल्याने अतिशय घाण दिसतात. त्यामुळे घराची साफसफाई करूनही घर अस्वच्छ दिसू लागते.

अशावेळी घरातील अशा लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. आईंक महिलांना लाईट स्विच बोर्ड, पंखे अशा गोष्टी नेमक्या स्वच्छ कशा करायच्या याबाबत माहिती नसते. आज आपण स्विच बोर्ड्स साफ करण्याचे काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेऊया. जेणेकरून अवघ्या काही मिनिटांत वर्षानुवर्षे काळे मळकट झालेले स्विच बोर्ड्स चमकू लागतील. चला पाहूया सोपे उपाय……

 

लिंबूचा रस आणि व्हिनेगर-

लाईटचे स्विच बोर्ड स्वच्छ करण्यात लिंबू आणि व्हिनेगर अत्यंत फायदेशीर आहेत. लिंबू आणि व्हिनेगरमध्ये असणारा ऍसिड स्विच बोर्ड्सवरील घाण लगेच साफ करतो. यासाठी एका जुन्या ब्रशवर किंवा सुती कापडावर व्हिनेगर आणि लिंबूचा रस मिक्स करून लावून घ्या. आणि हळुवारपणे स्विच बोर्ड्सवर फिरवा. अशाने स्विच बोर्ड्स स्वच्छ होतील.

 

थिनर किंवा नेलपेंट रिमूव्हर-

स्विच बोर्ड्स स्वच्छ करण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर आणि थिनर अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी एका जुन्या सुती कापडावर यातील कोणताही एक लिक्विड घ्या. आता त्याच्या मदतीने स्विच बोर्डवर हळूहळू पुसून घ्या. या उपायानेसुद्धा स्विच बोर्डवरील घाण लगेच स्वच्छ होईल.

लिंबू आणि बेकिंग सोडा-
लिंबू आणि बेकिंग सोडा विविध वस्तूंच्या साफसफाईमध्ये फायदेशीर समजले जाते. घरातील तेलकट आणि मळकट स्विच बोर्ड्सला साफ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा सहज वापरू शकता. यासाठी तुम्ही लिंबू आणि बेकिंग सोड्याची घट्ट पेस्ट बनवून घ्या. एका कपड्याच्या किंवा ब्रशच्या मदतीने हे मिश्रण स्विच बोर्डवर लावून स्वच्छ करून घ्या.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)