MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

डायबिटीसमध्ये वरदान आहेत ‘या’ ५ वनस्पतींची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मिळेल फायदा

Published:
डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आयुर्वेदिक उपाय केल्यानेसुद्धा रक्तातील साखर नियंत्रित करता येते.
डायबिटीसमध्ये वरदान आहेत ‘या’ ५ वनस्पतींची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मिळेल फायदा

Ayurvedic remedies to control sugar:   भारतात डायबिटीसची समस्या सतत वाढत आहे. दहापैकी ८ लोक डायबिटिसच्या समस्येने त्रस्त आहेत. डायबिटीस हा एक लाइफस्टाइलशी संबंधित आजार आहे. शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे डायबिटीसची समस्या वाढत आहे. डायबिटीसच्या समस्येवर कायमस्वरूपी इलाज उपलब्ध नाही.

परंतु योग्य आहार आणि लाइफस्टाइलमध्ये थोडेसे बदल करून डायबिटीस नियंत्रित करता येते. अनेकजण डायबिटीस नियंत्रित करण्यासाठी विविध औषधे घेत असतात. त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आयुर्वेदिक उपाय केल्यानेसुद्धा रक्तातील साखर नियंत्रित करता येते. आज आपण अशा काही वनस्पतींच्या पानांचे फायदे जाणून घेणार आहोत जे डायबिटीस नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. चला याबाबत जाणून घेऊया…..

 

कडुलिंबाची पाने-

कडुलिंबाला आयुर्वेदात आरोग्याचा खजिना म्हटले जाते. कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टरीअल आणि अँटी डायबिटिक गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळी ४ ते ५ कडुलिंबाची पाने चावून खा. त्यामुळे दिवसभर साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल.

 

तुळशीची पाने-

तुळशीला जितके धार्मिक महत्व आहे तितकेच त्याला औषधीय म्हत्वसुद्धा आहे. तुळशीमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. दररोज सकाळी ४-५ तुळशीची पाने चावून खाल्ल्याने साखर नियंत्रित होते.

कढीपत्ता-
कढीपत्ता फक्त जेवणाची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्याही विविध फायदे देते. कढीपत्त्यामधील गुणधर्म डायबिटीससाठी अतिशय फायदेशीर असतात. रोज सकाळी कढीपत्ताची पाने चावून खाल्ल्याने शुगर कंट्रोल होण्यास मदत होते.

बेलपत्र-
भगवान शिवसाठी प्रिय असणारे बेलपत्र अत्यंत औषधीय आहे. बेलपत्रामधील औषधीय गुणधर्मसुद्धा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. बेलपत्राच्या पानांचा रस शरीराला आतून डिटॉक्स करतो आणि शुगर कंट्रोल करतो. या पानांचा रस दररोज सकाळी उपाशी पोटी सेवन करा.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)