How to detoxify the body internally: आजकाल बदललेल्या जीवनशैलीसोबत लोकांच्या खाण्यापिण्यातही प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे बहुतेक लोक अनेक लहान-मोठ्या आजाराने त्रस्त आहेत. फास्टफूडच्या जमान्यात लोक पौष्टिक भाजी-भाकरीकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु या फास्टफूडच्या सततच्या सेवनाने शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होतात. आणि त्यामुळेच आरोग्य समस्या उद्भवतात.
परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे असे अनेक घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने शरीराला डिटॉक्स करता येते. या उपायांच्या मदतीने शरीरात साचलेली घाण नैसर्गिकरित्या शरीराबाहेर टाकली जाते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. याउलट त्वचा, केस आणि एकूण आरोग्यासाठी विविध फायदेच मिळतात. चला जाणून घेऊया घरगुती उपाय…..
तुळशी आणि काकडी-
तुळशी आणि काकडीमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. यासाठी दररोज रात्री एका ग्लासमध्ये काकडीच्या काही स्लाइस आणि तुळशीची काही पाने भिजत ठेवा. सकाळी उठून हे पाणी प्या. नियमित सेवनाने चांगला फायदा मिळेल.
लिंबू आणि मधाचे डिटॉक्स ड्रिंक-
लिंबू आणि मधसुद्धा शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सीफाय करण्यास मदत करते. त्यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घालून सेवन करा. नियमित सेवनाने नक्की फरक दिसेल.
बडीशेप-जिरे-ओवा-
हे तिन्ही मसाले आयुर्वेदाच्यादृष्टीने अत्यंत औषधीय आहेत. शरीर डिटॉक्स करण्यासाठी रात्री एक ग्लासमध्ये जिरे, ओवा आणि बडीशेप भिजत घाला. सकाळी उठून हे पाणी प्या. असे केल्याने शरीरातील सूज कमी होईल. आणि घाण निघून जाईल.
मेथीदाण्याचे पाणी-
मेथीसुद्धा शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी, रात्री एक चमचा मेथीदाणे भिजत घाला. सकाळी उठून हे पाणी प्या. अशाने शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. तसेच शरीर डिटॉक्स होऊन घाण शरीराबाहेर फेकली जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





