Home remedies to prevent hair loss: सध्या बहुतांश लोक केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. बिघडलेली जीवनपद्धती आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीराच्या विविध भागासोबतच केसांवरसुद्धा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे केस पांढरे होणे, कमकुवत होणे, केस गळणे या समस्या सुरु आहेत. लोक केसांवर अनेक महागड्या ट्रीटमेंट करतात. परंतु यामध्ये पैसे तर खर्च होतातच, शिवाय हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अनेकांच्या केसांवर विपरीत परिणाम होऊन केस जास्त प्रमाणत गळतात.
त्यामुळेच बरेच लोक घरगुती उपायांकडे वळत आहेत. केस गळती थांबवण्यासाठी काही कमी खर्चाचे आणि घरगुती उपाय अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे केसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आज आपण केस गळती थांबवण्यासाठी असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया…..
खोबरेल तेल आणि आवळ्याचा तेल-
खोबरेल तेल केसांसाठी उपयुक्त आहे हे आपल्याला माहितीच आहे. परंतु केस गळती रोखण्यासाठी आवळ्याचा तेल अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामधील व्हिटॅमिन्स सी केसांसाठी उत्तम कार्य करते. २० मिली खोबरेल तेलात थोडेसे आवळा तेल मिक्स करून केसांना चांगली मालिश करा. थोडा वेळ ठेऊन धुवून टाका. आठवड्यातून ४ वेळा असे केल्याने केस गळणे मोठ्या प्रमाणत कमी होते.
मेथीदाणे आणि खोबरेल तेल-
केस गळती रोखण्यासाठी मेथीसुद्धा अतिशय फायदेशीर आहे. यासाठी काही मेथीदाणे घेऊन ते तेलात गरम करून थंड झाल्यानंतर केसांना लावून मालिश करा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हे केल्याने फरक दिसून येईल.
मध आणि ऑलिव्ह ऑईल-
ऑलिव्ह ऑइल शरीरासोबतच केसांसाठीसुद्धा अतिशय उपयुक्त आहे. केस गळत असतील तर ऑलिव्ह ऑईलमध्ये मध मिसळून केसांना लावून घ्या. काही वेळ ठेऊन धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा सतत हे केल्याने केसगळती कमी होईल.
केळी आणि लिंबू-
केळी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर सारखे काम करते. केळी केसांना मऊ आणि चमकदार बनवतात. तसेच केस गळणे रोखण्यासाठी केळी अतिशय फायदेशीर आहेत. यासाठी केळीमध्ये लिंबूचे काही थेंब मिसळून मॅश करून ते केसांना लावून घ्या. काही दिवस दररोज असे केल्याने केस गळणे थांबते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





