Rashmika Vijay Marriage : दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रेमसंबंधांवरून सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय रंगत असतो. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी गुपचूप सगाई केल्याची चर्चा माध्यमांतून जोर धरून आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये विजयच्या टीमने दोघांच्या सगाईची पुष्टी केल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मात्र एका नव्या फोटोमुळे विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या एका व्हायरल फोटोमध्ये हे जोडपे लग्नाच्या पोशाखात दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
काय आहे Viral फोटो मध्ये (Rashmika Vijay Marriage)
फोटोत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली असून त्यांच्या गळ्यात माळा घातलेल्या दिसत आहेत. पार्श्वभूमीला फुलांची सजावट आणि जोडप्याच्या नावांची अक्षरे दिसत असल्यामुळे हा फोटो त्यांच्या लग्न सोहळ्यातील असल्याचे भास निर्माण झाले आहेत. सर्वाधिक लक्ष वेधून घेतो तो भाग म्हणजे या फोटोमध्ये प्रभास, महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरही या जोडप्यासोबत उभे असल्याचे दिसते. त्यामुळे चाहत्यांना एक क्षण वास्तवात लग्न सोहळा झाला असावा असे वाटू लागले.
AI जनरेटेड फोटो
मात्र काही चाहत्यांनी बारकाईने पाहिल्यानंतर हा फोटो AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्यक्षात लग्न झाल्याची गोष्ट फक्त चर्चा पुरती असल्याचे दिसून आले. तरीदेखील या फोटोने चाहत्यांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण केले आहेत – लग्नाचे काउंटडाउन सुरू झाले का? Rashmika Vijay Marriage
याचदरम्यान ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या यशानंतर आयोजित केलेल्या पार्टीत रश्मिकाने विजयचा खास उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधले. आपल्या भाषणात तिने या प्रोजेक्टचे महत्त्व सांगताना विजयने सुरुवातीपासून दिलेला आधार हा तिच्यासाठी मोठा दिलासा असल्याचे नमूद केले. तिने भावनिक स्वरात प्रत्येकाच्या आयुष्यात ‘एक विजय असतो’ असे म्हटले, हीच ओळ सोशलवर चर्चेचा विषय ठरली आहे.
विजयनेही रश्मिकाचे कौतुक करत तिच्या मेहनतीचे आणि यशाचे श्रेय तिलाच दिले. गेल्या काही वर्षांत तिने मोठी प्रगती केली असून ‘द गर्लफ्रेंड’ने तिच्या करिअरला वेगळा आयाम दिल्याचे तो म्हणाला.
काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, विजय-रश्मिका जोडपे फेब्रुवारी 2026 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे एका आलिशान पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहेत. या समारंभाला निवडक पाहुण्यांचाच प्रवेश असणार असल्याची चर्चा आहे. जोडप्याने स्वतःहून मात्र अद्याप अधिकृतरित्या कोणताही खुलासा केलेला नाही.
एकूणच, व्हायरल फोटो, सक्सेस पार्टीतील वक्तव्ये आणि सगाईच्या पुष्टीमुळे विजय-रश्मिका यांच्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा उधाण आले आहे. पुढे या जोडप्याने काय निर्णय घेतला, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





