Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या स्पाय-ऍक्शन ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला. भारतात 503.20 कोटी तर वर्ल्डवाइड तब्बल 751.98 कोटींची कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचला. आता चाहत्यांना सर्वात जास्त उत्सुकता लागली आहे ती ‘धुरंधर 2’ची. हा सिक्वेल 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या दरम्यान चित्रपटातील जमील जमालीची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता राकेश बेदी यांनी कथानकाबाबत मोठा खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की दुसऱ्या भागात अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळतील. ते म्हणाले की, पहिल्या भागात राहमान डकैत आणि काही राजकीय विरोधक असूनही जमीलने हमजाला सत्तेच्या शिखरावर पोहोचवले. पण आता जमीलच्या लक्षात आले आहे की हमजा आपली मनमानी करू लागला आहे, त्यामुळे तो त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करेल. पुढे विनोदी शैलीत त्यांनी जास्त तपशील उघड न करण्याचं संकेत दिले. Dhurandhar 2
हिंसक दृश्यांवरून काय म्हणाले?Dhurandhar 2
‘धुरंधर’मधील हिंसक दृश्यांवरून वादंग उठले होते. याबाबत राकेश बेदी म्हणाले की, हिंसा दाखवण्याची गरज कथानकात होती. राम-रावणाचा संदर्भ देत ते म्हणाले, खलनायक अत्यंत निर्दयी असल्याने संघर्ष तर होणारच. चित्रपट वास्तवाशी जोडलेला असून हिंसा महिमामंडित करण्याचा हेतू नाही, तर कथेला वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न आहे.
रसिकांसाठी आणखी एक मनोरंजक माहिती अशी की, जमील जमालीचा कनेक्शन दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ब्लॉकबस्टर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’शी जोडला गेला आहे. 2019 मधील ‘उरी’मध्ये राकेश बेदी यांनी ISI एजंटचे पात्र साकारले होते. त्याच पात्राला ‘धुरंधर’मधून पुढे विस्तार देण्यात आला आहे. अभिनेता म्हणतो, या भूमिकेमुळे त्याला खूप काही वेगळं करायला संधी मिळाली असून सिक्वेलमध्ये जमील अधिक धोकादायक दिसणार आहे.
धुरंदर तुफान फॉर्मात
‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह (हमजा अली मजारी), अक्षय खन्ना (रहमान डकैत), अर्जुन रामपाल (मेजर इकबाल), संजय दत्त (एसपी चौधरी असलम), आर. माधवन (अजय सान्याल), सारा अर्जुन (यालिना जमाली) आणि राकेश बेदी (जमील जमाली) प्रमुख भूमिकेत दिसले होते. सुमारे 225 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर तुफान कमाई करत सीक्वेलबाबतची अपेक्षा अजून उंचावल्या आहेत.
आता पाहायचं म्हणजे ‘धुरंधर 2’मध्ये जमील-हमजा यांच्यातील सत्ता संघर्ष किती तीव्र होतो आणि या स्पाय ऍक्शन फ्रँचायझीचा पुढचा अध्याय किती रोमांच उलगडतो.





