What Asthma Patients Should Eat in Winter: वातावरणात बदल होताच विविध आरोग्य समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे सतत सर्दी, खोकला, ताप त्रास देतो. तसेच थंडीत दम्याच्या रुग्णांची समस्यादेखील वाढते. थंड हवा आणि वातावरणातील प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळेच हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांनी आहारात काही बदल करण्याची आवश्यकता असते. असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच श्वसनाच्या समस्या दूर करतात. आज आपण जाणून घेऊया दम्याच्या रुग्णांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे….
हळदी-
हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांनी आपल्या आहारात हळदीचा नक्की समावेश करावा. हळदीमध्ये असलेले करक्युमिन आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म श्वसन मार्गाची सूज कमी करतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येत नाही. त्यामुळे दम्यात हळदी अत्यंत फायदेशीर आहे.
आले-
आयुर्वदानुसार आलेसुद्धा अतिशय औषधीय आहे. आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी होते. श्वसनाच्या समस्या दूर होऊन दम्यात आराम मिळतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी विविध प्रकारे आल्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
डाळिंब-
डाळिंब हा शरीरासाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. डाळिंबाच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते सर्वांनाच माहिती आहे. पण डाळिंबातील गुणधर्म दम्यातसुद्धा फायदेशीर आहेत. डाळिंबात अँटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म असतात ते फुफ्फुसांतील टिश्यू डॅमेज होण्यापासून रोखतात.
पालक-
पालकमध्ये व्हिटॅमिन्स, आयरन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. पालक सेवन केल्याने अनेक दम्यातसुद्धा फायदेशीर ठरते. त्यातील गुणधर्म श्वसनाच्या समस्या कमी होतात. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी आहारात पालकचा समावेश नक्की करावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





