सकाळच्या रुटीनमध्ये सामील करा ‘या’ गोष्टी, त्वचेला मिळेल नैसर्गिक ग्लो

Published:
आपण एकामागून एक प्रॉड्क्टस आपल्या त्वचेवर लावतो, परंतु आपल्या त्वचेला खरोखर त्यांचा फायदा होत आहे की नाही याकडे दुर्लक्ष करतो.
सकाळच्या रुटीनमध्ये सामील करा ‘या’ गोष्टी, त्वचेला मिळेल नैसर्गिक ग्लो

How to make your skin glow:   आजकाल चमकदार आणि स्वच्छ त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण विविध गोष्टी वापरतो. बऱ्याचदा, लोकांचा असा विश्वास असतो की आपण आपल्या त्वचेवर जितके जास्त थर लावू तितका जास्त फायदा होईल. त्यामुळे आपण बाजारातून अनेक क्रीम आणि लोशन खरेदी करतो.

नंतर, आपण ते एकामागून एक आपल्या त्वचेवर लावतो, परंतु आपल्या त्वचेला खरोखर त्यांचा फायदा होत आहे की नाही याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्वचा नैसर्गिकरित्या नितळ बनवण्यासाठी आपल्या दिनचर्येत काही आवश्यक बदल करण्याची आवश्यकता असते. आज आपण याबाबत जाणून घेऊया…..

उठल्यावर कोमट पाणी प्या-
त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्यावे. कारण रात्री पाणी शोषले जाते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी पित असाल, तर यापूर्वी तुम्ही एक पूर्ण ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमच्या त्वचेत आणि शरीरात ओलावा टिकून राहतो.

चेहऱ्यावरची घाण साफ करणे-
सकाळी उठून कोमट पाणी पिल्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. यामुळे रात्री त्वचेवर साचलेले तेल आणि बॅक्टेरिया धुऊन जातील. यामुळे त्वचेचा वरचा थर खराब होण्यापासून वाचू शकतो. या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या पिंपल्सरख्या समस्याही दूर होतात.

आहार-
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. हे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास आणि नैसर्गिकरित्या तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करते. तसेच तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करावा. हे दोन्ही पोषक घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत आणि अनेक समस्या टाळण्यास मदत करू शकतात.

घरातही सनस्क्रीन वापरावे-
ऋतू कोणताही असो तुम्ही सनस्क्रीन नक्कीच वापरायला हवे. प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी ते आवश्यक आहे. घरीसुद्धा सनस्क्रीन वापरायची सवय लावा. परंतु प्रत्येक त्वचा वेगळी असते, म्हणून तुम्ही उच्च एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे. यामुळे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)