पोटात सतत आग आणि जळजळ होतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास मिळेल आराम

Published:
तुमच्या खाण्याच्या चुकीच्या सवयींचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि पोटाच्या समस्या सुरु होतात.
पोटात सतत आग आणि जळजळ होतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास मिळेल आराम

How to reduce stomach burning and irritation:   अनेक लोक पोटात जळजळ आणि आग होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. ज्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. खरं तर, आजच्या धावपळीच्या जीवनात आणि इतरांपेक्षा सरस ठरण्याच्या धावपळीत लोकांनी त्यांची जीवनशैली बिघडवली आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे सकाळी उशिरा उठणे अशा दिनचर्येने पचनावर वाईट परिणाम होतो आणि पोटाशी संबंधित समस्या वाढतात.

या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.ज्यांचे पालन करून पोटात आग होणे, जळजळ होणे, आम्लपित्त यासारख्या समस्या टाळता येतात. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत याबाबत जाणून घेऊया….

पचायला जड पदार्थ टाळा –
आपल्या आहारात पचण्यास कठीण आणि जास्त प्रोटीन किंवा फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश करताना काळजी घ्या. अशा पदार्थांमुळे आम्लपित्त होऊ शकते. रात्री हलके जेवण घ्या आणि रात्रीचे जेवण वेळेवर करा जेणेकरून रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत दोन तासांचे अंतर असेल.

जेवल्यानंतर शारीरिक हालचाल-
आजकाल, लोक कामावरून परतल्यानंतर इतके थकलेले असतात की त्यांना लगेच झोपावेसे वाटते. त्यामुळेच अनेकजण रात्रीच्या जेवणानंतर, लगेच अंथरुणात पडून टीव्ही पाहत झोपी जातात. जर तुम्ही असे करत असाल तर आजच थांबा. कारण जेवणानंतर लगेच झोपायला जाणे किंवा झोपल्याने पचनसंस्थेमध्ये अडथळा येतो आणि पोटाच्या समस्या वाढतात. म्हणूनच जेवणानंतर शतपावली करा.

भूक असेल तेवढंच खा-
अनेकफ़ लोक चांगले पदार्थ बघून जास्त खातात. पण हे चुकचं आहे. ज्यामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. योग्य प्रमाणात खाल्याने आम्लपित्त आणि पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)