MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

प्रेग्नेन्सीमध्ये सतत होतेय डोकेदुखी? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम

Published:
प्रेग्नेंसीमध्ये डोकेदुखी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. या उपायाने कोणतेही दुषपरिणम होत नाहीत.
प्रेग्नेन्सीमध्ये सतत होतेय डोकेदुखी? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम

Remedies for headache during pregnancy:   प्रेग्नन्सी हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय सुखद आणि तितकाच आव्हानात्मक काळ असतो. प्रेग्नेन्सीमध्ये महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यामुळे विविध आरोग्य समस्यासुद्धा उद्भवत असतात. प्रेग्नेन्सीमध्ये अनेक महिलांना डोके दुखण्याची समस्या असते. तज्ज्ञांच्या मते शारीरिक आणि मानसिक बदल, तसेच हार्मोन्स बदलाने डोकेदुखी होत असते.

यादरम्यान काहीही औषधे घेणे सोयीचे नसते. त्यामुळे अनेक महिला डोकेदुखीच्या वेदना सहन करत असतात. प्रेग्नेंसीमध्ये डोकेदुखी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. या उपायाने कोणतेही दुषपरिणम होत नाहीत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे उपाय करून आराम मिळवू शकता. चला पाहूया हे उपाय नेमके काय आहेत….

दूध आणि दालचिनी पावडर-
प्रेग्नेंसीमध्ये डोकेदुखी दूर करण्यासाठी एक कप दुधात ३ चमचे दालचिनी पावडर मिसळून चांगले उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्यात मध घालून त्याचे सेवन करा. असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

मध आणि ऍपल सायडर व्हिनेगर-
प्रेग्नन्ट महिलांनी डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर आणि दोन चमचे मध घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे आराम मिळेल.

आयुर्वेदिक चहा-
प्रेग्नन्सीमधील डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा लिंबूची पाने वाटून त्यात कॅमोमाइल आणि लव्हेंडर मिसळून त्याचा चहा बनवून प्यावे. असं केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळेल.

पुरेसे पाणी-
प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर पाणी [पिणे गरजेचे असते. अनेकदा शरीरात डिहायड्रेशन होऊनसुद्धा डोकेदुखी होऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता दूर झाल्यास डोकेदुखीपासूनही आराम मिळेल.

लोह आणि फॉलिक ऍसिड-
प्रेग्नेन्सीमध्ये डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी योग्य आहार तितकाच महत्वाचा आहे. आहारात लोह आणि आयरनयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा-
प्रेग्नेन्सीमध्ये अनेकदा महिलांना डोकेदुखी होत असते. यासाठी अनेकदा कॅफिनचे प्रमाणही कारणीभूत असू शकते. जर तुम्ही सतत चहा-कॉफी पित असाल तर त्याचे प्रमाण कमी करा. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)