Home remedies for chapped lips: सध्या हिवाळा सुरु आहे. हिवाळ्यात थंड हवामानामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातीलच एक म्हणजे त्वचा आणि ओठ फुटणे किंवा कोरडे पडणे होय. थंड हवामानात त्वचेतील आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडते आणि फुटते. अनेकदा लोक मॉईशराइझर किंवा कोल्ड क्रीम लाऊनसुद्धा ओठ फुटतात.
अशावेळी काही घरगुती उपाय करून ओठ फुटण्यापासून रोखता येते. या उपायाने ओठ मऊ आणि गुलाबी होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आज आपण थंडीत ओठ फुटण्यापासून थांबण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात ते जाणून घेऊया…..
गुलाबाच्या पाकळ्या-
गुलाबाच्या पाकळ्या विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरल्या जातात. गुलाबाच्या पाकळया ओठ फुटण्याची समस्या दूर करतात. काही गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात भिजत ठेवा. थोड्या वेळाने त्याची बारीक पेस्ट करून घ्या. नंतर लीप बामप्रमाणे ते ओठांवर लावा. रोज असे केल्याने ओठ मऊ होतील.
लिंबूचे रस-
हिवाळ्यात ओठ फुटून काळे पडतात. अशावेळी एक चमचा लिंबूच्या रसात थोडे मध मिसळून घ्या. हे मिश्रण ओठांवर लावून घ्या. सुकल्यानंतर ते हाताने स्क्रब करून काढून घ्या. नंतर पाण्याने धुवून ओठांवर लीप बाम लावून घ्या.
डाळिंबाचा रस-
ओठ मऊ करण्यासाठी एक चमचा मधात डाळिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावून घ्या. सुकल्यानंतर ते हाताने स्क्रब करून काढून थंड पाण्याने धुवून घ्या. नंतर लगेच लीप बाम लावा.
ग्लिसरीन आणि गुलाबजल-
फुटलेले ओठ मऊ आणि गुलाबी बनवण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबजल फायदेशीर असते. हिवाळ्यात दररोज रात्री ग्लिसरीन आणि गुलाबजल लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी बनतात.
दुधाची साय-
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा आणि ओठांमधील आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडते. अशावेळी दुधाची साय ओठांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. दररोज रात्री झोपताना ओठांवर दुधाची साय लावून मसाज केल्याने ड्राय स्किन निघून जाते. आणि ओठ मऊ बनतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





