MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

डायबिटीसपासून ते लिव्हरपर्यंत उपयुक्त आहेत शेवग्याची पाने, जाणून घ्या फायदे

Published:
शेवग्याच्या शेंगा तर फायदेशीर आहेतच. परंतु तुम्हाला शेवग्याच्या पानांच्या फायद्यांबाबत माहिती असले पाहिजे.
डायबिटीसपासून ते लिव्हरपर्यंत उपयुक्त आहेत शेवग्याची पाने, जाणून घ्या फायदे

Benefits of drumstick leaves:  आपण दररोज खात असणारे अनेक पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. परंतु लोकांना त्याचे फायदे माहिती नसतात. त्यातीलच एक म्हणजे शेवगा होय. शेवगा आपण अनेक प्रकारे खातो परंतु त्याच्या फायद्यांबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. शेवग्याच्या शेंगा तर फायदेशीर आहेतच. परंतु तुम्हाला शेवग्याच्या पानांच्या फायद्यांबाबत माहिती आहे का? आज आपण शेवग्याच्या पानांचे फायदे जाणून घेऊया.

शेवग्याच्या पानांमधील पौष्टिक गुणधर्म-
शेवग्याच्या पानांमध्ये शरीराला आवश्य्क असणारे विविध प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. तज्ज्ञांच्या मते, शेवग्याच्या पानांत कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयरन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन्स बी ३, फॉस्फेरस असे अनेक पोषक घटक असतात.

लिव्हरसाठी फायदेशीर-
शेवग्या पानांमध्ये असलेले गुणधर्म लिव्हरचे फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात. शिवाय लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासही फायदेशीर आहे. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

नर्व्हस सिस्टमचे आजार दूर करते-
शेवग्याच्या पानांमध्ये असलेले अँटी ऑक्सीडेन्ट नर्व्हस सिस्टीमला सुधारून मेंदूशी संबंधीत आजार दूर करतात. शेवग्याच्या पानांमुळे ताणतणाव आणि नैराश्यसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर-
शेवग्याच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म डायबिटीस रुग्णांच्या शरीरात ब्लड शुगर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आणि डायबिटीसमध्ये उद्भवणाऱ्या विविध समस्या रोखते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते-
शेवग्याच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सीडेन्ट असतात. जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात. नियमित शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने दीर्घकाळ दृष्टी निरोगी राहते.

दम्यामध्ये फायदेशीर-
शेवग्याची पाने दम्यासारखे श्वसनाचे आजार दूर करण्यास मदत करते. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म श्वसन मार्गाची सुजन आणि जळजळ कमी करते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)