MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

ताणतणाव दूर करतात ‘हे’ ५ उपाय, आनंदी राहण्यासाठी आजच बदला सवयी

Published:
तुम्ही घरच्या घरी काही टिप्स फॉलो करून ताणतणावापासून आराम मिळवू शकता.
ताणतणाव दूर करतात ‘हे’ ५ उपाय, आनंदी राहण्यासाठी आजच बदला सवयी

Remedies to reduce stress:  आजकाल लोकांसाठी ताणतणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. कामाच्या ठिकाणापासून ते घरातसुद्धा विविध गोष्टींमुळे लोक तणावात असतात. जॉब, करिअर, शिक्षण, रिलेशनशिप, आर्थिक टंचाई अशा विविध कारणांमुळे लोक तणावात असतात. परंतु सततचा ताण तुमच्या मानसिक आरोग्यासबतच शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो.

त्यामुळे आजकाल अनेकजण ताणतणावर मनमोकळेपणाने बोलत आहेत. अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. त्यासोबतच घरच्या घरी काही टिप्स फॉलो करून ताणतणावापासून आराम मिळवू शकता. आज आपण तणाव आणि नैराश्य दूर करणाऱ्या अशाच काही टिप्स जाणून घेऊया….

 

व्यायाम आवश्यक आहे-

दररोजच्या तणावपूर्ण जगात व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. व्यायामुळे शरीरात आनंद निर्माण करणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे तुमचा मूड एकदम फ्रेश होतो. आणि तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते. अशाने तुमचा ताणतणाव दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. शिवाय वजनही नियंत्रणात राहते.

 

निरोगी आहार-

नोकरी-व्यवसाय करणारे अनेक लोक सतत फास्टफूड आणि लगेच बनणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात. घरातील पौष्टिक अन्न सोडून सतत बाहेरील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. तसेच याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित घरातील भाजीपाला, फळे आणि धान्ये खाण्याची सवय लावा. अशाने तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील.

स्क्रीन टाइम कमी करा-
अलीकडे लोक जास्तीत-जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असतात. त्यासाठी ते सतत मोबाईल, लॅपटॉप आणि विविध गॅझेट्स वापरत असतात. सतत स्क्रीन पाहून पाहून डोळ्यावर ताण येतो. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होतो. सतत स्क्रीन पाहून मेंदूची काम करण्याची क्षमतादेखील कमी होते. त्यामुळे स्वतःला काही सवयी लावून घ्या. यामध्ये स्क्रीन टाइमसाठी एक निश्चित वेळ द्या. त्यावेळेतच मोबाईल चेक करा. झोपण्याच्या किमान एक-दोन तास आधी मोबाईल बाजूला ठेऊन द्या. अशाने ताणतणाव दूर होऊन नवी ऊर्जा मिळेल.

पुरेशी झोप-
कामाच्या व्यायामुळे किंवा इतर अनेक समस्यांमुळे लोक पुरेशी झोप घेत नाहीत. शिवाय अनेक लोक रात्री जागून मोबाईल, टीव्ही किंवा पार्ट्या करत असतात. हळहळू या सवयींमुळे झोपेवर परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने ताणतणाव तर येतेच शिवाय अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे दररोज ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. अशाने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. आणि ताणतणाव दूर होईल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)