Benefits of regular cycling: आजकालच्या व्यग्र जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून, नियमित साधेसोपे व्यायाम केल्याने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. या व्यायामांमध्ये सायकल चालवण्याचादेखील समावेश होतो. दररोज फक्त १५ ते ३० मिनिटे सायकल चालविल्याने शरीर सक्रिय होते. विविध आजार दूर होण्यास मदत होते.
अनेकजण सायकल फक्त मौजमजा म्हणून फिरवत असतात. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सायकल फिरविल्याने करमणूक तर होतेच शिवाय शारीरिक आरोग्यदेखील लाभते. आज आपण दररोज ३० मिनिटे सायकल चालविण्याचे फायदे जाणून घेऊया…..
तरुण दिसण्यासाठी उपयुक्त-
सायकल हा एक अतिशय प्रभावी आणि कमी ताकतीचा व्यायाम आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज ३० मिनिट सायकल फिरविल्याने ब्लड सेल्स ऍक्टिव्ह होतात. त्यांना पुरेसे ऑक्सिजन मिळते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि तरुण दिसते. त्यामुळे सायकल चालविल्याने अधिक काळ तरुण दिसू शकतात.
आजार दूर राहतात-
दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने शरीरातील इम्यून सेल्स जागृत होतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने विविध आजार दूर राहतात. तसेच सायकल चालविल्याने हृद्य, फुफ्फुसे निरोगी राहून त्यासंबंधित समस्या दूर होतात.
मेंदू तीक्ष्ण होतो-
सायकल चालविल्याने फक्त हृदय आणि फुफ्फुसेच नाही तर मेंदूसुद्धा निरोगी राहतो. अमेरिकेतील एका अभ्यासानुसार, सायकल चालविल्याने मेंदूमध्ये नवीन कोशिकांचा विकास होतो. त्यामुळे सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त मेंदू तीक्ष्ण होतो.
चांगली झोप लागण्यास फायदेशीर-
दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. अनेकांना ताणतणावामुळे झोप लागत नाही. अशावेळी सायकल चालविल्याने शारीरिक कसरत होईल. आणि त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





