MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Sanjay Raut : तेच EVM मशीन, तेच आकडे; पराभवानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Published:
Last Updated:
संजय राऊत म्हणाले, विधानसभेचे आकडे पाहिले तर आजच्या नगरपालिका निवडणुकीतही त्याचप्रमाणे आकडे पाहायला मिळत आहेत. 120-125 भाजप, शिवसेनेचे 54 आणि 40-41 अजित पवार. आताही आकडे तेच आहेत. मशीनची सेटिग तीच कायम आहे. आकड्यात अजिबात बदल झालेला नाही.
Sanjay Raut : तेच EVM मशीन, तेच आकडे; पराभवानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. एकूण 288 नगरपरिषद आणि नगरपालिकेत भाजपला सर्वाधिक 120 जागा मिळाल्या. त्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेला 57 म्हणतात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 37 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीची अक्षरशः वाताहत झाली. काँग्रेसला 33, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 आणि ठाकरेंच्या शिवसेनेलाही अवघ्या 10 जागा जिंकता आल्या. या दारुण पराभवाचे खापर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन वर फोडल आहे… तेच मशीन तेच आकडे आणि तोच पैसा असं म्हणत संजय राऊत आणि महायुतीवर सडकून टीका.केली

काय म्हणाले संजय राऊत

आज निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, विधानसभेचे आकडे पाहिले तर आजच्या नगरपालिका निवडणुकीतही त्याचप्रमाणे आकडे पाहायला मिळत आहेत. 120-125 भाजप, शिवसेनेचे 54 आणि 40-41 अजित पवार. आताही आकडे तेच आहेत. मशीनची सेटिग तीच कायम आहे. आकड्यात अजिबात बदल झालेला नाही. भाजपने मशीन त्याचं पद्धतीने फिट केल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. Sanjay Raut

महायुतीकडून पैशाची गारपीठ

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीकडून वारेमाप पैसा वाटण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाकडून 150 कोटींचा खर्च करण्यात आला. या निवडणुकीत पैशांची गारपीठ झाली. या गारपीठीत कोण टिकणार?? नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चार्टर फ्लाइट, हेलिकॉप्टरचा वापर झाला. स्पर्धा इथे सत्ताधारी पक्षातच होती. पैशांचा प्रचंड धुरळा उडाला” अशी टीका संजय राऊत यांनी केली.