MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

थंडीमुळे त्वचा खूपच कोरडी होऊन रक्त येतंय? ‘हे’ घरगुती उपाय टिकवून ठेवतील ओलावा

Published:
संवेदनशील कोरड्या त्वचेवर काहीही लावणे फायदेशीर ठरत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास नक्की फायदा मिळू शकतो.
थंडीमुळे त्वचा खूपच कोरडी होऊन रक्त येतंय? ‘हे’ घरगुती उपाय टिकवून ठेवतील ओलावा

Home Remedies for Dry Skin in winter:  हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं तसतसं हवेतील रुक्षपणा वाढतो. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा एकदम कोरडी पडते. त्वचेतील कोरडेपणा वाढल्याने त्वचा फाटते, अंगाला खाज सुटते, बऱ्याचदा त्वचा फाटून त्यातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते.

फाटलेल्या त्वचेसाठी लोक विविध महागडे प्रॉड्क्टस वापरतात. परंतु अनेकांना संवेदनशील त्वचेमुळे काहीही लावणे फायदेशीर ठरत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास नक्की फायदा मिळू शकतो. हे घरगुती उपाय तुमची त्वचा मऊ करतात शिवाय नैसर्गिक चमकसुद्धा देतात…..

 

तूप-

जर तुम्हाला हिवाळ्यात त्वचेवर नैसर्गिकरित्या ओलावा हवा असेल तर तूप त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुपातील गुणधर्म त्वचेतील कोरडेपणा दूर करून त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतात. हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर नियमित तूप लावल्याने त्वचा चमकू लागते.

 

बदाम तेल-

बदाम तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बदाम तेलातील गुणधर्म त्वचेला ओलावा देते. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते. यासाठी दररोज रात्री थोडेसे बदाम तेल घेऊन चेहऱ्यावर हळुवारपणे मालिश करा. रात्रभर असेच राहू द्या. त्यामुळे दिसवभर चेहरा मऊ आणि चमकदार राहील.

खोबरेल तेल-
खोबरेल तेलात त्वचेला मऊ बनवणारे गुणधर्म असतात. खोबरेल तेलातील गुणधर्म त्वचेच्या कोशिकांमधील जागा मऊ बनवतात आणि त्वचेला चमक देतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचा मऊ आणि चमकदार बनते. यासाठी खोबरेल तेलाचे काही थेंब घेऊन त्वचेवर मालिश करा त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.

मध-
मध एक नैसर्गिक मॉईशराइझर आहे. हिवाळ्यात त्वचेला ओलावा आवश्यक असतो. त्यासाठी त्वचेला ह्युमेक्टंटची आवश्यकता असते. ह्युमेक्टंट ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. आणि मधाला नैसर्गिक ह्युमेक्टंट म्हणतात. त्यामुळे मध लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. शिवाय मधामुळे त्वचा चमकदार आणि मऊ बनते.

कोरफड-
कोरफड हे शतकानुशतके सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. कोरफड त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठीदेखील तितकेच फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्वचेवर कोरफड लावल्याने कोरडेपणा निघून जातो आणि त्वचा मऊ होते. कोरफड त्वचेसोबत केसांनाही मऊ आणि चमकदार बनवते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)