MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

लोह वाढवण्यासाठी नियमित खा ‘हे’ ५ पदार्थ, वाढेल हिमोग्लोबिन, मिळेल ताकद

Published:
आपल्याकडे असे अनेक पदार्थ उपब्लध आहेत, जे आहारात समाविष्ट केल्यास लोह वाढण्यास मदत होते.
लोह वाढवण्यासाठी नियमित खा ‘हे’ ५ पदार्थ, वाढेल हिमोग्लोबिन, मिळेल ताकद

Iron rich foods in Marathi:   आजकाल शरीरात लोहाची कमतरता होणे ही सामान्य समस्या आहे. खासकरून महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येणे, चक्कर येणे, थकवा, चिडचिड अशा समस्या उद्भवतात. लोह शरीरात हिमग्लोबीन तयार करण्यासाठी आणि ऑक्सिजन पोहचवण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे लोहाची कमतरता झाल्यास विविध समस्या निर्माण होतात.

शरीरात लोहाची कमतरता दूर करून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे आणि सप्लिमेंट्स घेतात. परंतु आपल्याकडे असे अनेक पदार्थ उपब्लध आहेत, जे आहारात समाविष्ट केल्यास लोह वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया हे पदार्थ नेमके कोणते आहेत…..

 

पालक-

शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर सर्वात आधी पालक खाण्याचा सल्ला देतात. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. १०० ग्रॅम पालकमध्ये जवळपास २.७ मिग्रॅम लोह असते. विशेष म्हणजे व्हिटॅमिन्स सी असलेल्या पदार्थांसोबत पालक खाल्ल्याने शरीरात लोह लवकर शोषले जाते.

 

गूळ-

गूळ हा लोहाचा एक चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात गूळ सेवन केल्याने फक्त उबदारपणाचं मिळत नाही, तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच शेंगदाण्यासोबत गूळ खाल्ल्याने लोह वाढण्यास मदत होते.

डाळिंब-
डाळिंब हा फळ चवीला उत्तम असण्यासोबतच शरीरासाठी फायदेशीरसुद्धा आहे. डाळिंबाला लोहाचा खजिना म्हटले जाते. कारण यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. डाळिंब खाल्ल्याने रक्त शुद्ध तर होतेच शिवाय रक्त वाढण्यासही मदत होते.

बीट-
बीटमध्ये फॉलिक ऍसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. बीटचे सेवन केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. तसेच बीट ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करते. बीटमधील गुणधर्म लोहाची कमतरता दूर करून इतर अनेक फायदे देतात.

तीळ-
तीळ आणि खासकरून काळे तीळ लोहाचा उत्तम स्रोत आहे. एक चमचा तीळामध्ये लोह, कॅल्शिअम आणि जिंक मोठ्या प्रमाणात असतात. तीळ खाल्ल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढून रक्ताची कमतरता दूर होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)