MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

कॅल्शिअमचा मोठा स्रोत आहेत ‘या’ ४ डाळी, नियमित सेवनाने हाडे होतात मजबूत

Published:
डाळींचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन हाडांना बळकटी मिळते, लोहाची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
कॅल्शिअमचा मोठा स्रोत आहेत ‘या’ ४ डाळी, नियमित सेवनाने हाडे होतात मजबूत

Which pulses contain calcium:   भारतीय लोकांच्या आहारात डाळ हा महत्वाचा भाग आहे. दररोज डाळ खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. बहुतांश लोक दिवसातून दोनदा न चुकता डाळींचे सेवन करतच असतात. डाळी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. हे सर्वांनाच महियी आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल की, डाळी हा कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन्सचासुद्धा चांगला स्रोत आहे.

डाळींचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन हाडांना बळकटी मिळते, लोहाची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच पचनाच्या समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे कॅल्शिअम वाढून हाडे मजबूत होतात आणि सांध्यांचे दुखणे कमी होते. सर्वच डाळी फायदेशीर असतात. परंतु काही डाळी जास्त उपयुक्त आणि पौष्टिक असतात. आज आपण अशाच काही डाळींबाबत जाणून घेऊया जे कॅल्शिअम वाढवण्यास मदत करतात…..

 

मसूर डाळ-

मसूरची डाळ पोषक तत्वांनी समृद्ध असते. तसेच ती पचायलाही हलकी असते. त्यामध्ये फॅट कमी आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. १०० ग्रॅम मसूर डाळीत जवळपास २४ ग्रॅम प्रोटीन असते. तसेच मसूरच्या डाळीत कॅल्शिअमचे प्रमाणसुद्धा चांगले असते. त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. आणि सांध्याच्या समस्या दूर होतात.

 

मूग डाळ-

मूग डाळीतसुद्धा अनेक पोषक तत्वे असतात. मूग डाळ सर्वात सात्विक आणि पौष्टिक समजली जाते. त्यामध्ये असलेले आयरन, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि प्रोटीन शरीरासाठी आवश्यक असतात. मूग डाळीने कॅल्शिअम तर वाढतेच शिवाय बद्धकोष्ठता, पचनाच्या इतर समस्या दूर होतात.

उडीद डाळ-
उडिदाची डाळ कॅल्शिअमने समृद्ध असते.त्यामुळेच ती हाडे आणि सांध्यांसाठी अतिशय फायदेशीर समजली जाते. त्यातील लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन ताकद मिळते. आयुर्वेदात उडीद डाळीला बलवर्धक आहार समजले जाते.

कुळीथ डाळ-
कुळथाची डाळसुद्धा अतिशय पौष्टिक असते. कुळथाच्या डाळीत कॅल्शिअम, आयरन, प्रोटीन आणि पोटॅशिअमसारखे विविध गुणधर्म असतात. त्याच्या सेवनाने हाडांमध्ये ताकत येते. विविध समस्या दूर होतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)