Liver problems and symptoms: आजकाल बदलेली जीवनशैली, आहाराच्या बदलेल्या पद्धती आणि ताणतणाव यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हरची समस्या होय. शारीरिक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या खाणपणामुळे अनेकदा लिव्हर म्हणजेच यकृतावर जास्त चरबी जमा होता. त्यालाच फॅटी लिव्हर असे म्हणतात.
अलीकडे अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या त्रास देत आहे. त्यामुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. बहुतेक लोकांना फॅटी लिव्हरबाबत माहितीच नसते. परंतु शरीराच्या विविध भागांवर याची काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ओळ्खल्यास त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते. आज आपण या लक्षणांबाबत जाणून घेऊया….
चेहऱ्यावरील बदल-
जेव्हा लिव्हरमध्ये काही अडचणी येतात तेव्हा त्याचा सर्वात जास्त प्रभाव चेहऱ्यावर दिसून येतो. लिव्हर जेव्हा बिलीरूबिन योग्यरीत्या बाहेर काढू शकत नाही तेव्हा त्यामध्ये समस्या निर्माण होतात. याचा सर्वात जास्त बदल चेहऱ्यावर दिसतो. फॅटी लिव्हरमध्ये चेहरा एकदम निस्तेज आणि पिवळा बनतो. चेहऱ्यासोबत हात, पाय आणि डोळेसुद्धा पिवळे दिसू लागतात.
खाज-
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यास शरीरावर लाला चट्टे आणि रॅशेस दिसू लागतात. त्याला प्रचंड खाज सुटते. बऱ्याचवेळा ती ऍलर्जी वाटते परंतु फॅटी लिव्हरनेसुद्धा खाज सुटण्याची समस्या होऊ शकते.
चेहऱ्यावर सूज –
फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये चेहऱ्यावरील चमक गायब होते. चेहरा एकदम निस्तेज आणि रुक्ष बनतो. शिवाय चेहऱ्यावर रेषा दिसू लागतात. तसेच चेहऱ्यावर सूज येऊ लागते.
बारीक लाल रेषा-
फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये शरीरावरसुद्धा काही बदल दिसून येतात. यामध्ये हाता पायावर कोळीच्या जाळ्याप्रमाणे बारीक लाल रेषा दिसून येतात. ज्याला आपण रेड वेसल्स म्हणतो.
शरीरावर निळे व्रण-
फॅटी लिव्हरची समस्या असेल तर शरीरावर निळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. फॅटी लिव्हरमध्ये काही लागले तरी निळ्या रंगाचे डाग पडतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





