MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

हिवाळ्यात दररोज खा २ अंजीर, आरोग्याला मिळतील ५ जबरदस्त फायदे

Published:
Last Updated:
सुक्या अंजीरच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, आरोग्याच्या विविध समस्या दूर होतात.
हिवाळ्यात दररोज खा २ अंजीर, आरोग्याला मिळतील ५ जबरदस्त फायदे

Benefits of eating figs in winter:   अंजीर हा एक टेस्टी आणि अतिशय पौष्टिक फळ आहे. अनेकजण आवडीने अंजीर खातात. अंजीर कोणी फळाच्या स्वरूपात खाणे पसंत करते तर कोणी सुकलेले अंजीर ड्रायफ्रूट्सच्या स्वरूपात खाणे पसंत करते. कच्चे अंजीर चवीला गोड आणि थोडे तुरट असते. तर सुकलेले अंजीर जास्त गोड लागते. परंतु चावायला थोडे कठीण वाटते. परंतु तरीही ते अतिशय पौष्टिक असते.

हिवाळ्यात सुके अंजीर खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. सुक्या अंजीरच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, पोटाच्या विविध समस्या दूर होतात. आज आपण हिवाळ्यात दररोज २ सुके अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत…..

 

वजन कमी करण्यास फायदेशीर-

वजन कमी करण्यासाठी भूक नियंत्रित करणे सर्वात महत्वाचे असते. त्यासाठी सुके अंजीर अतिशय उपयुक्त आहे. अंजीरमध्ये विघटनशील फायबर असते. म्हणूनच बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. अशाने वजन नियंत्रित करण्यास मदत होते.

 

महिलांसाठी फायदेशीर-

महिलांना अनेकदा मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात. अनेक महिलांना मासिक पाळीत पोटात आणि कंबरेत प्रचंड वेदना होतात. अशावेळी सुके अंजीर खाल्ल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच मासिक पाळी वेळेत येण्यास मदत होते. शिवाय पीसीओडीसारख्या समस्यांमध्येदेखील बराच फायदा मिळतो.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते-
अंजीरमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आंकुचित होतात. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो. अशावेळी अंजीर खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.

बद्धकोष्ठता दूर करते-
अनेकांना पचनाच्या विविध समस्या असतात. काहींना सकाळी बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही. अशावेळी दररोज सुके अंजीर खाल्ल्याने पोटातील आतड्यांचे कार्य सुधारते. आणि त्यामुळे शौचाला साफ होण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)