राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला असला तरी तापमानात अद्यापही गारवा आहेच. हवामानात सातत्याने बदल होत असून धुकंही वाढल्याचं दिसत आहे. भारतीय हवामान विभागानेही तापमानाबाबत मोठा इशारा दिला आहे. आगामी काळात हवामान बदलांसाठी सज्ज राहा. महाराष्ट्रातील हवामानात मागील दोन दिवसांपासून बदल पाहायला मिळत असून किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे तीव्र गारठ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांत थंडी कायम असून पुढील काही दिवस सौम्य गारवा जाणवणार आहे. 19 डिसेंबर रोजी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कसे राहील, याचा सविस्तर अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र होणार ?
दरम्यान महाराष्ट्रातही काही भागांत थंडीच्या लाटा अनुभवयास मिळतील, तर काही भागांत मात्र कोरडे हवामान असेल. मुंबई व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल, कमाल तापमान 18 तर किमान तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या तापमानात काही अंशानी वाढ होऊ शकते.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने गारवा कमी होईल. असं असलं तरी पुण्यात सकाळच्या वेळी धुकं दिसे, इथलं किमान तापमान 10 अंशांपर्यंत राहील.
दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलेला पाहायला मिळत आहे. आणखी पुढील काही दिवस तापमानात घट होऊ शकते अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. थंडीच्या वातावरणात आहे व्यायाम आरोग्यासाठी अधिक पोषक असल्याने अनेक नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत.उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका थोडासा कमी झाला आहे. नाशिकमध्ये 9 अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये ही किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही किमान तापमानाचा पारा 9 ते 10 अंशाच्या दरम्यान असेल.
महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.





