Mobile Recharge Price Hike : अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आजकाल मोबाईल रिचार्ज ही सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईलला रिचार्ज नसेल तर तो मोबाईल हातात घेण्यात काहीच अर्थ नसतो…. त्यामुळे एकवेळ जेवण राहिले तरी चालेल परंतु मोबाईल रिचार्ज हा तत्परतेने मारला जातो. परंतु आता हाच मोबाईल रिचार्ज सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाप लावणार आहे. कारण येत्या नवीन वर्षात मोबाईल रिचार्ज च्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया त्यांच्या रिचार्जच्या किमती आणखी महाग करण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम कंपन्या होणार मालामाल (Mobile Recharge Price Hike)
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत जवळपास २० टक्के वाढ करू शकतात. म्हणजे जर तुम्ही २०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला आता २४० रुपये मोजावे लागतील. या निर्णयामुळे आधीच महागाईमुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी धक्का बसणार आहे. परंतु दुसरीकडे टेलिकॉम उद्योगाच्या महसुलात वाढ होऊन या कंपन्या मालामाल होऊ शकतात. Mobile Recharge Price Hike
काय आहे अहवालात
फायनान्शियल सर्व्हिसेसमधील प्रसिद्ध कंपनी मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्या २०२६ मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ४G/५G दोन्ही प्लॅनवर १६-२०% दर वाढवू शकतात. यामुळे २०२७ च्या आर्थिक वर्षात कंपन्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) देखील वाढेल. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, कंपन्या स्वस्त प्लॅन काढून टाकत आहेत आणि अधिक महागड्या प्लॅनमध्ये OTT सारखे फायदे ग्राहकांना ऑफर करत आहेत. यामुळे ग्राहकांना महागडे प्लॅन निवडण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यांचे जास्तीचे पैसे खर्च





