Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा!! रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय

Published:
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा रेपो दर 5.25 टक्के इतकाच ठेवण्यात आला असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा!! रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय

Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा रेपो दर 5.25 टक्के इतकाच ठेवण्यात आला असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI वर तात्काळ कोणताही परिणाम होणार नाही.

कर्जदारांसाठी काय अर्थ? Repo Rate

रेपो रेट स्थिर ठेवल्यामुळे गृहकर्जाच्या EMI मध्ये वाढ होणार नाही.  कार लोन / पर्सनल लोनचे हप्ते पूर्ववत राहतील.  नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी दरात बदल होणार नाही.  बँकांच्या कर्जदरात तातडीचा फेरबदल अपेक्षित नाही म्हणजेच, तुमचा मासिक हप्ता जैसे थे राहणार आहे. Repo Rate

अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – RBI गव्हर्नर

पतधोरण जाहीर करताना RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर अनिश्चितता असली तरी भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सक्षम आहे. त्यांच्या मते, महागाई दर सुमारे 4% च्या आसपास नियंत्रणात आहे.  उद्योग क्षेत्रावर अतिरिक्त ताण नाही आणि सर्वसामान्यांवर महागाईचा मोठा भार नाही. त्यामुळे रेपो दर बदलण्याची गरज भासली नाही. RBI ने 2025–26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज सुधारित केला आहे. आधीचा अंदाज: 7.3% होता आता नवीन अंदाज: 7.4% इतका आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews