Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी राहिल्यामुळे ज्यांना गेल्या काही महिन्यांचा लाभ मिळू शकला नाही, अशा पात्र महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे मिळून ४५०० रुपये एकत्र जमा करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान जुन्नर येथे झालेल्या सभेत बोलताना शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली.
ई-केवायसीमुळे थांबलेले हप्ते आता एकत्र जमा (Ladki Bahin Yojana)
ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक लाभार्थी महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते प्रलंबित राहिले होते. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी होती आणि काही ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले होते. आता प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी, कागदपत्रांची तपासणी, पात्रतेची खात्री ही प्रक्रिया सुरू असून, त्रुटी नसलेल्या आणि पात्र ठरणाऱ्या महिलांना तीन महिन्यांची रक्कम एकरकमी देण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana
“लाडकी बहीण योजना ही आईच्या प्रेरणेतून” — शिंदे
सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजना ही माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची योजना आहे. आईच्या प्रेरणेतून या योजनेची संकल्पना आली. महिलांनी स्वबळावर उभं राहावं, आत्मनिर्भर व्हावं आणि लखपती व्हावं, हा या योजनेमागचा उद्देश आहे.लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासनही लवकरच पूर्ण केले जाईल असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.






