क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! आशिया चषकात भारत-पाक सामना होणार की नाही? केंद्राचे स्पष्टीकरण समोर

Written by:Rohit Shinde
Published:
आशिया कपचे वातावरण बनू लागले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मॅचचे काय होणार, असा सवाल सातत्याने विचारला जात होता, त्याबाबत आता केंद्राचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! आशिया चषकात भारत-पाक सामना होणार की नाही? केंद्राचे स्पष्टीकरण समोर

आशिया कप स्पर्धेचे वातावरण बनू लागले आहे. यामध्ये सातत्याने भारत-पाक सामान्याचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याबाबत क्रिडा मंत्रालयाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हायव्होल्टेज ठरणारा भारत पाक सामना होणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी भारत-पाक सामना म्हणजे मोठी पर्वणी असते.

भारत-पाकिस्तान भिडणार!

क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असं म्हटलं आहे. जर केवळ दोनच देशांमध्ये क्रिकेट सामन्यांची स्पर्धा असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोधच असता असंही केंद्राने म्हटलं आहे. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले. त्याशिवाय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेत आशियातील अनेक देश सहभागी होत असल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आशिया चषक स्पर्धेला येत्या 9 सप्टेंबर दुबईत सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 10 तारखेला यूएईविरुद्ध तर दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळवला जाणार आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक

भारतीय संघाला आशिया कपच्या गट अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि युएईसह स्थान देण्यात आले आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध होईल. भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळेल. आशिया कप दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-4 टप्प्यातील टॉप 2 संघांमध्ये जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

सूर्यकुमार यादव हाच आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.  अशिया कप स्पर्धा ही आशियाई क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे.  ही स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार आहे.

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षितराणा, रिंकू सिंग. असा भारतीय संघ असणार आहे. (Team india squad for asia cup)असा भारताचा संघ असणार आहे.