१. लाला अमरनाथ – मोहिंदर अमरनाथ
लाला अमरनाथ हे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले खेळाडू होते. त्यांनी भारतासाठी एकूण २४ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी ९७८ धावा केल्या आणि ४५ बळी घेतले. कसोटीसोबतच त्यांचे प्रथम श्रेणीतील करिअरही अत्यंत उल्लेखनीय होते. लाला अमरनाथ यांनी १८६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०,४२६ धावा केल्या आणि ४६३ विकेट्सही घेतल्या.
२. लाला अमरनाथ – मोहिंदर अमरनाथ
लाला अमरनाथ यांचे पुत्र मोहिंदर अमरनाथ हे भारताचे सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी एक मानले जातात. भारताने 1983 च्या विश्वचषकात जेव्हा विजय मिळवला, तेव्हा त्या ऐतिहासिक विजयानात मोहिंदर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोहिंदर यांनी भारतासाठी 69 कसोटी आणि 85 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 11 शतकांच्या जोरावर 4378 धावा केल्या आहेत, तर वनडेत 1924 धावा केल्या आहेत.
३. जिओफ मार्श – शॉन मार्श आणि मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज जिओफ मार्श यांनी आपल्या कारकिर्दीत 50 कसोटी आणि 117 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीत 2854 आणि वनडेत 4357 धावा केल्या.
जिओफ यांचे दोघेही पुत्र शॉन मार्श आणि मिचेल मार्श हे देखील ऑस्ट्रेलियाचे अत्यंत गुणवान क्रिकेटपटू राहिले आहेत.
शॉन मार्श यांनी 38 कसोटीत 2265, 73 वनडेत 2773 आणि 15 टी20 सामन्यांत 255 धावा केल्या आहेत.
मिचेल मार्श अजूनही ऑस्ट्रेलियासाठी सक्रियपणे खेळत आहेत. त्यांनी आतापर्यंत 46 कसोटी, 93 वनडे आणि 67 टी20 सामने खेळले आहेत.
मिचेलने कसोटीत 2083, वनडेत 2794 आणि टी20 मध्ये 1674 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी कसोटीत 51, वनडेत 57 आणि टी20 मध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत.
४. क्रिस ब्रॉड – स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडसाठी खेळणारे माजी फलंदाज क्रिस ब्रॉड यांनी 25 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 1661 आणि वनडेत 1361 धावा केल्या आहेत.
त्यांचे पुत्र स्टुअर्ट ब्रॉड यांचा कारकिर्द मात्र दंतकथेसारखा आहे. स्टुअर्ट ब्रॉड यांनी इंग्लंडसाठी 167 कसोटी, 121 वनडे आणि 56 टी20 सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 604, वनडेत 178 आणि टी20 मध्ये 65 बळी टिपले आहेत.





