भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक वनडे शतके
भारतामध्ये टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करण्याचा जागतिक विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. डिव्हिलियर्सने भारतीय भूमीवर टीम इंडियाविरुद्ध ११ डावांत ५ शतके झळकावली होती.
दरम्यान, डेरिल मिचेलने भारतात भारताविरुद्ध ८ वनडे डावांत ४ शतके केली आहेत. याचा अर्थ असा की भारतीय खेळपट्ट्यांवर मिचेल प्रत्येक दुसऱ्या वनडे डावात शतक करत आहे.
५ शतके – एबी डिव्हिलियर्स (११ डावे)
४ शतके – डेरिल मिचेल (८ डावे)
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून डॅरिल मिशेल भारतीय गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करत आहे. भारताविरुद्धच्या त्याच्या पहिल्या चार एकदिवसीय डावांमध्ये तो अर्धशतक झळकावू शकला नाही, परंतु भारताविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या सात एकदिवसीय डावांमध्ये त्याने चार शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. मिशेलने एकदिवसीय स्वरूपात टीम इंडियाविरुद्ध ७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.





