आयपीएलमध्ये टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन्सचा कसा होता परफॉर्मन्स? सूर्या ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट

Written by:Smita Gangurde
Published:
आयपीएलचा सिझन नुकताच पार पडला. या सिझनमध्ये 2024 साली टी-20 वर्ल्डकप टुर्नामेंट जिंकणाऱ्या टीम इंडियातील सर्व प्लेयर्सचा सहभाग होता. त्यात उत्तम कामगिरी कोणी केली याचा आढावा.
आयपीएलमध्ये टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन्सचा कसा होता परफॉर्मन्स? सूर्या ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट

मुंबई- आयपीएल 2025 चा सिझन यंदा 73 दिवसांचा होता. मंगळवारी झालेली फायनल मॅच रॉयल चँलेंजर्स बंगळुरुनं जिंकली. बंगळुरुच्या टीमनं पंजाब किंग्सचा 6 रन्सनी पराभव केला. या विजयानं पहिल्यांदाच बंगळुरुच्या टीमला आयपीएल विजेतेपदाचा मान मिळाला.

आयपीएलच्या यंदाच्या टुर्नामेंटमध्ये 2024 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियातील 15 क्रिकेटर्सचा सहभाग होता. या सर्व क्रिकेटर्सची कामगिरी आयपीएलमध्ये वाखाणण्याजोगी राहिली. सूर्यकुमार यादव यानं सर्वाधिक स्कोअर केला. तर विराट कोहलीनं या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक 8 हाफ सेंच्युरी केल्या. बॉलर अर्शदीप सिंगनं सर्वाधिक विकेट्स काढल्या. हार्दिक पांड्या बेस्ट ऑलराऊंडर राहिला.

कोणत्या प्लेयरची काय कामगिरी?

1. रोहित शर्मा

टीम इंडियाचा कॅप्टन राहिलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं खेळला. 15 मॅचमध्ये त्यानं 149.28 स्ट्राईक रेट राखत बॅटिंग केली. या सिझनमध्ये त्यानं 4 हाफ सेंच्युरी केल्या. रोहितच्या कामगिरीवर मुंबईची टीम क्वालिफायर-2 पर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरली.

2. विराट कोहली-

आरसीबीकडून ओपनर म्हणून पिचवर उतरणाऱ्या विराट कोहलीनं जोरदार कामगिरी केली. या सिझनमध्ये 8 हाफ सेंच्युरी करत 657 रन्सची कमाई त्यानं केली. आयपीएलच्यासलग तिसऱ्या सिझनमध्ये 600 पेक्षा जास्त रन त्याच्या खात्यावर जमा आहेत.

3. सूर्यकुमार यादव-

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱअया सूर्यकुमार यादवची कामगिरी सर्वोत्तम राहिली. 16 मॅचमध्ये त्यानं बॅटिंग केली आणिप्रत्येक मॅचमध्ये 25 पेक्षा जास्त रन्स जोडल्या. सूर्यानं 5 हाफ सेंच्युरी करत 167.91 स्ट्राईक रेटनं 717 रन्स या टुर्नामेंटमध्ये केले. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्याला मिळाला.

4. हार्दिक पांड्या-

मुंबई चॅम्पियन्सचा कॅप्टन राहिलेल्या हार्दिक पांड्याची कामगिरीही दमदार राहिली. 15 मॅचमध्ये फिनिशरची भूमिका बजावताना 224 रन्स त्यानं केले. बॉलिंगमध्येही 14 विकेट त्यानं घेतल्या. सलग 6 मॅचेस जिंकत मुंबईच्या टीमला प्लेऑफपर्यंत पोहचवण्यात मोठा वाटा राहिला.

5. अर्शदीप सिंग-

अर्शदीप सिंगनं पंजाब किंग्सकडून उत्तम कामगिरी केली. 17 मॅचमध्ये सर्वाधिक 21 विकेट त्यानं मिळवल्या. फायनल मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट त्यानं काढल्या. अर्शदीपच्या चांगल्या बॉलिंगमुळेच पंजाबची टीम फायनलपर्यंत पोहचू शकली.

Follow Us :GoogleNews