भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलची भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे आणि श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीही मजबूत संघ आहेत. दोन्ही देशांमधील आयसीसी क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
आयसीसी फलंदाजी क्रमवारीत भारताचे वर्चस्व
आयसीसी फलंदाजी क्रमवारीत भारताचे वर्चस्व कायम आहे. टॉप ५ यादीत एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश नाही, तर तीन भारतीय खेळाडू या यादीत आहेत. आयसीसी फलंदाजी क्रमवारीत टॉप १० मध्ये एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही. भारताचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल ७८४ रेटिंग गुणांसह यादीत अव्वल स्थानावर आहे.
हे ही वाचा
शुभमन गिल – भारत
इब्राहिम झद्रान – अफगाणिस्तान
रोहित शर्मा – भारत
बाबर आझम – पाकिस्तान
विराट कोहली – भारत
आयसीसी गोलंदाजी क्रमवारीतही भारत आघाडीवर
आयसीसी बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या पाचमध्ये भारताचा एक खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचाही या यादीत एकही खेळाडू नाही. भारताचा कुलदीप यादव आयसीसी एकदिवसीय बॉलिंग रँकिंगमध्ये ६५० रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
रशीद खान – अफगाणिस्तान
केशव महाराज – दक्षिण आफ्रिका
महिष थीक्शना – श्रीलंका
जोफ्रा आर्चर – इंग्लंड
कुलदीप यादव – भारत
आयसीसी ऑल-राउंडर रँकिंग
आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय ऑल-राउंडर रँकिंगमध्ये भारत किंवा ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू नाही. अफगाणिस्तानचा अझमतुल्ला उमरझाई ३३४ रेटिंग गुणांसह यादीत अव्वल आहे.
अझमतुल्ला उमरझाई – अफगाणिस्तान
सिकंदर रझा – झिम्बाब्वे
मोहम्मद नबी – अफगाणिस्तान
रशीद खान – अफगाणिस्तान
मेहदी हसन मिराज – बांगलादेश