तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३३७ धावा केल्या. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर परदेशी संघाने केलेली ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे. डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकांच्या जोरावर, किवी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजी संघाला पूर्णपणे धुळीस मिळवून दिले. मिशेलने १३७ धावा करत मालिकेतील त्याचे सलग दुसरे शतक झळकावले.
मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा विल यंग यावेळी अपयशी ठरला आणि त्याने ३० धावा केल्या. तथापि, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी विक्रमी २१९ धावांची भागीदारी करून संघाला ३०० धावांचा पल्ला गाठला. मिशेलने १३७ धावा केल्या, तर फिलिप्सने १०६ धावा केल्या.
इंदूरमधील सर्वात मोठा ODI स्कोअर (परदेशी संघाकडून)
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा स्कोअर करणारा परदेशी संघ बनण्याचा मान पटकावला आहे. याआधीही हा विक्रम न्यूझीलंडच्याच नावावर होता. २०२३ मध्ये भारताविरुद्ध येथे त्यांनी २९५नधावा केल्या होत्या. मात्र आता किवी संघाने स्वतःचाच विक्रम मोडत ३३७ धावांचा भव्य स्कोअर उभारला असून, इतिहास रचला आहे.
इंदूरमधील होळकर स्टेडियमवर परदेशी संघांचे सर्वाधिक ODI स्कोअर
३३७ धावा – न्यूझीलंड विरुद्ध भारत (सध्याचा सामना)
२९५ धावा – न्यूझीलंड विरुद्ध भारत (२०२३)
२९३ धावा – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (२०१७)
२८८ धावा – इंग्लंड विरुद्ध भारत (२००६)
२६५ धावा – वेस्ट इंडीज विरुद्ध भारत (२०११)
हर्षित–कुलदीपची जोरदार धुलाई
राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादवने ८२ धावा दिल्या होत्या. आता इंदूरमध्येही त्याच्या कामगिरीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. येथे त्यांनी ६ षटकांत ४८ धावा दिल्या.
हर्षित राणाने नेहमीप्रमाणे नव्या चेंडूने प्रभावी कामगिरी करत डेवॉन कॉनवे आणि विल यंग यांची विकेट घेतली. या सामन्यात त्याने एकूण ३ विकेट घेतल्या, मात्र १० षटकांत ८४ धावा दिल्या.
भारताकडून मोहम्मद सिराज हा एकमेव गोलंदाज ठरला, ज्याने ६ पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्याने १० षटकांत फक्त ४३ धावा दिल्या आणि एक बळी घेतला.