भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एक टी-२० मालिकाही खेळवली जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याने सुरू होईल. सूर्यकुमार यादव टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करतील. काही खेळाडू एकदिवसीय मालिकेनंतरच टी-२० संघात सामील होतील. उर्वरित खेळाडू टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पोहोचले आहेत.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.
टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ
मिच मार्श (कर्णधार), सीन अबॉट, झेविअर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शस, नॅथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा.
टी-२० सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. मालिकेतील शेवटचा सामना ८ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
पहिला सामना – २९ ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरा सामना – ३१ ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना – २ नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना – ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना – ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन
भारताने वनडे मालिका गमावली
भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या ऐवजी शुभमन गिलकडे सोपवण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन सामने खेळले गेले असून टीम इंडियाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया सध्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. वनडे मालिकेचा शेवटचा आणि तिसरा सामना सिडनी येथे खेळवला जाणार आहे.





