भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याने स्वत:लाच एक लक्झरी कार भेट दिली आहे. ही कार Lamborghini Urus आहे, जी अपडेटेड SE वर्जनमध्ये उपलब्ध आहे. रोहित यांनी यापूर्वीही हीच कार खरेदी केली होती, पण त्यांनी जुनी Lamborghini Dream11 फॅंटसी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास देण्याचा निर्णय घेतली होती.

या वेळी रोहित शर्मा याने Lamborghini Urus कार ऑरेंज शेडमध्ये खरेदी केली आहे, जी त्यांच्या आधीच्या ब्लू Urus पेक्षा वेगळी आहे. Lamborghini Urus च्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले गेले आहेत. यामध्ये नवीन LED मॅट्रिक्स हेडलाइट डिझाइन दिले गेले आहे, जे आधीच्या Y-मोटिफपेक्षा वेगळे आहे.

कारचा फ्रंट बंपर आणि ग्रिल अधिक आक्रमक लूक देतो. याशिवाय, या कारमध्ये 23 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत, जे कारच्या स्पोर्टी दिसण्याला अधिक भर घालतात.

Lamborghini Urus SE ची किंमत किती आहे?

Lamborghini Urus SE ची एक्स-शोरूम किंमत ४.५७ कोटी रुपये आहे. यामध्ये 4.0-लीटर ट्विन-टर्बो V8 इंजिन वापरले गेले आहे, जे 620hp पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते.

याशिवाय, Lamborghini Urus SE मध्ये 25.9kWh लिथियम आयन बॅटरीसह प्लग-इन हायब्रिड सिस्टम दिला आहे.

Lamborghini Urus SE ची पॉवर किती आहे?

या कारच्या इंजिनने एकूण 800 bhp पॉवर आणि 950 Nm टॉर्क निर्माण केले आहे. इलेक्ट्रिक मोडमध्ये ही SUV 60 किलोमीटर चालू शकते आणि 130 km/h पर्यंत स्पीडवर EV मोडमध्ये कार्य करते.

ही कार 0 ते 100 km/h वेग फक्त 3.5 सेकंदांमध्ये गाठते, तर तिची टॉप स्पीड 312 किलोमीटर प्रति तास आहे.

रोहित शर्मा यांच्या लग्जरी कार कलेक्शनमध्ये Mercedes-Benz S-Class (१.५० कोटी रुपये), Range Rover HSE LWB (२.८० कोटी रुपये), Mercedes GLS 400 D, आणि BMW M5 (१.७९ कोटी रुपये) यांचाही समावेश आहे.