MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Gujarat Titans Win : पावसाच्या अडथळ्यात गुजरात विजय! प्लेऑफसाठी मुंबईचे गणित अवघड

Written by:Arundhati Gadale
Published:
Last Updated:
रोहित आणि रिकेल्ट लवकर परतल्यानंतर विल्यम जॅक्स आणि सूर्यकुमारने मुंबईचा डाव सावरला. जॅक्सने 35 चेंडूत 53 धावा केल्या. तर, सुर्याने 24 चेंडूत 35 धावा केल्या.
Gujarat Titans Win :  पावसाच्या अडथळ्यात गुजरात विजय! प्लेऑफसाठी मुंबईचे गणित अवघड

मुंबई : गुजरातने विरुद्ध मुंबईच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईत आठ गडी गमावाल 155 धावा केल्या होत्या. या धावांचे पाठलाग करताना गुजरात साई सुदर्शनच्या रुपाने आपली पहिली विकेट पटकन गमावली. मात्र, कर्णधार शुभम गिल आणि जोश बटलरने गुजरातचा डाव सावरला. मात्र, एकामागून एक विकेट गमावत गुजरात बॅकफूटवर गेली आहे.

पावसामुळे कधी या सामन्याचे पारडे मुंबईच्या बाजुने कधी गुजरातच्या बाजुने झुकत होते. अखेर डीआरएसने गुजराला तीन विकेट घोषित करण्यात आले गुजरात सामन्या वरचढ ठरत असताना जसप्रित बुमरा यांना शुभमन गील आणि शाहरुख खान यांना आऊट करत मुंबईला पुन्हा सामन्यात आणले. जेव्हा पावसाने सामना थांबला तेव्हा मुंबईच पाच रन्सने गुजरातच्या पुढे होती.

Gujarat Beats Mumbai

मुंबईला सुरुवातीला धक्के

मुंबई प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली मात्र त्यांची सुरुवात आश्वासक झाली नाही. अवघ्या दोन धावा फलकावर लागल्या असताना पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने मुंबईचा ओपनर रिकेल्ट याला अवघ्या दोन धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित शर्मा देखील स्वस्तात परतला. अर्शद खानने त्याला सात धावांवर बाद केले. त्यामुळे मुंबईचा अवस्था तीन बाद 27 झाली.

विल्यम जॅक्स- सुर्यकुमारने सावरले

रोहित आणि रिकेल्ट लवकर परतल्यानंतर विल्यम जॅक्स आणि सूर्यकुमारने मुंबईचा डाव सावरला. जॅक्सने 35 चेंडूत 53 धावा केल्या. तर, सुर्याने 24 चेंडूत 35 धावा केल्या. सूर्याची विकेट साई सुदर्शनने घेत जॅक्स- सुर्यामध्ये होत असलेली भागीदारी फोडली. सूर्य आऊट झाल्यानंतर जॅक्स देखील राशिद खानने आऊट केले. त्यानंतर मुंबईची घसरगुंडी उडाली मात्र कॉर्बिन बॉश यांच्या 27 धावांमुळे मुंबईचा संघ 155 धावांपर्यंत मजल मारू शकला.